शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

Kolhapur: शासन दारी..९४ लाखांचा मांडव भारी, कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीन कोटींचा खर्च

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 11, 2023 11:45 IST

शासनाच्या तिजोरीतून मोठा खर्च केला जात असल्याची विरोधी पक्षांची तक्रार होती

इंदुमती गणेशकोल्हापूर : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा भव्यदिव्य मांडवाचा खर्च ९४ लाखांवर तर लाभार्थींना कार्यक्रमस्थळी ने-आण करणाऱ्या एसटी बससाठी २ कोटी १४ लाख असे जवळपास ३ कोटींची बिले जिल्हा प्रशासनाकडे आली आहेत. लाभार्थींच्या जेवणाचा खर्च नेते व सामाजिक संस्थांनी केला आहे. अल्पोपाहार, योजनेची प्रचार-प्रसिद्धी यासह अन्य यंत्रणांची बिले काढण्याचे काम अजून सुरू असले तरी शासन आपल्या दारी येण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी खर्च होण्याची शक्यता आहे.शासन आपल्या दारी उपक्रमाचा कोल्हापुरात १२ जूनला तपोवन मैदानावर दिमाखदार सोहळा झाला. यासाठी शासनाच्या तिजोरीतून मोठा खर्च केला जात असल्याची विरोधी पक्षांची तक्रार होती. या खर्चाबद्दल लोकांत कमालीची उत्सुकता असल्याने लोकमतने जिल्हा प्रशासनाकडून त्याची माहिती मिळवली. या कार्यक्रमासाठी कणेरी मठावरील लोकोत्सवासाठी घालण्यात आलेल्या मांडवाप्रमाणेच भव्य मांडव उभारण्यात आला होता, ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. मांडव, व्यासपीठ, खुर्च्या आणि विद्युत व्यवस्था यांचे मिळून विभागाने जिल्हा नियोजन समितीला ९८ लाखांचे बिल दिले आहे.

जर्मन हँगर पद्धतीचा मांडवजर्मन हँगर पद्धतीचा हा ३ लाख चौरस फुटांचा मांडव कॉलम फ्री म्हणजेच मध्ये एकही खांब न रोवता उभारण्यात आला होता. पाऊस झालाच तर मांडवाला गळती लागू नये, यासाठी वॉटरप्रूफ करण्यात आला होता. मांडव अग्निरोधक होता. विद्युत व्यवस्था, ठिकठिकाणी फॅनची सोय होती. तो घालण्यासाठी व काढण्यासाठी प्रत्येकी आठ दिवस यंत्रणा राबत होती.

नियोजनकडून ९६ लाखांना मान्यताशासनाने या कार्यक्रमासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ०.२ टक्के निधी वापराला मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने ४८० कोटींवर ९६.६३ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. दरम्यान, परिवहन महामंडळाकडून २ कोटी १४ लाखांचे बिल आले आहे, त्यापैकी ७० लाख रुपये सत्ताधारी आमदारांनी दिलेल्या निधीतून भागविण्यात येणार आहेत. उर्वरित बिल कसे द्यायचे यावर अजून शासनाकडून मार्गदर्शन आलेले नाही.

आमदारांकडून प्रत्येकी २० लाखसत्ताधारी पक्षातील आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रत्येकी २० लाख रुपये आमदार निधीतून दिले आहेत. विरोधी पक्षाच्या आमदारांनादेखील शक्य तितकी रक्कम द्यावी, असे मागणीचे पत्र पाठवण्यात आले आहे. पण अजून त्यांच्याकड़ून प्रतिसाद आलेला नाही.

मान्यतेनंतर निघणार बिले..लाभार्थींच्या जेवणाचा खर्च राजकीय नेत्यांनी व सामाजिक संस्थांनी केला आहे, त्यावर शासनाचा एकही पैसा खर्च झालेला नाही. सरकारी पैशांद्वारे भरलेल्या सर्व वस्तूंचे युनिट दर देखील प्रचलित बाजार दरांपेक्षा कमी आहेत. याशिवाय प्रचार, प्रसिद्धी, यंत्रणेतील इतर खर्च व त्यांची बिले काढण्याचे काम अजून प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्हा नियोजन विभागाकडून पुनर्नियोजनाच्या निधीअंतर्गत अर्थ विभागाकडून मान्यता घेऊन बिले अदा केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदे