शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Gokul Milk Election : आबिटकरांचं ठरलं, गोकुळला विरोधी आघाडीसोबतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 11:41 IST

Gokul Milk Election kolhapur: शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय शुक्रवारी सकाळी गारगोटी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला.

ठळक मुद्दे आबिटकरांचं ठरलं, गोकुळला विरोधी आघाडीसोबतचलोकमतने दोन दिवसांपूर्वीच दिले होते वृत्त

कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय शुक्रवारी सकाळी गारगोटी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला.

विरोधी आघाडीत त्यांना किती जागा मिळणार हे स्पष्ट झालेले नाही. परंतू तरीही त्यांनी नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे यांच्यासाठी आग्रह धरल्याचे सांगण्यात येते. त्यांना गोकुळमध्ये एक जागा देवून जिल्हा परिषदेत आबिटकर गटाच्या वंदना जाधव यांना सत्तेत संधी द्यावी असाही प्रस्ताव आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आमदार आबिटकर यांनी पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला. लोकमतने दोन दिवसांपूर्वीच आबिटकर हे विरोधी आघाडीसोबतच राहतील असे वृत्त दिले होते.आबिटकर गटाला दोन्ही आघाड्यांकडून पायघड्या घालण्यात आल्या होत्या. या गटाला मानणारा राधानगरी व भुदरगड तालुक्यात ठरावधारक वर्ग आहे. त्यांच्याकडे सुमारे दीडशे ठराव असल्याचा दावा केला जातो. त्यामुळेही या गटाच्या भूमिकेला महत्त्व आले. गेल्या निवडणूकीत हा गट विरोधी आघाडीसोबतच होता. परंतू विधानसभेला काँग्रेसचे आमदार व गोकुळच्या सत्तारुढ आघाडीचे नेते पी.एन.पाटील यांची मदत झाल्याने आबिटकर यांच्यापुढे खासदार संजय मंडलिक की आमदार पी. एन. पाटील यांपैकी कुणासोबत जायचे, असे धर्मसंकट उभे राहिले होते.आबिटकर यांनी पहिली निवडणूक मंडलिक ब्रँडवर लढविली. त्यामुळे मंडलिक गटाशी त्यांची जवळीक जास्त आहे. त्यातही ते शिवसेनेचे आमदार आहेत. विरोधी आघाडी दोन्ही काँग्रेससह शिवसेनाही सहभागी आहे. पक्षीय बंधन, मंडलिक यांच्यासोबतची बांधिलकी, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबतची जवळीक याचा विचार करून त्यांनी विरोधी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर