शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अभिरूचीतर्फे कोल्हापूर सिंगिंग आयडॉल स्पर्धेस प्रतिसाद, दहा स्पर्धकांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 3:59 PM

हौशी व नवोदित गायकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. या उद्देशाने अभिरूची संस्थेतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे कोल्हापूर सिंगिंग आयडॉल स्पर्धेच्या रविवारी झालेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापूर सिंगिंग आयडॉल स्पर्धेस उदंड प्रतिसादअभिरूची कोल्हापूरतर्फे आयोजन ; अंतिम फेरीसाठी दहा जणांनी निवड

कोल्हापूर : हौशी व नवोदित गायकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. या उद्देशाने अभिरूची संस्थेतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे कोल्हापूर सिंगिंग आयडॉल स्पर्धेच्या रविवारी झालेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली.गेली ३८ वर्षे नाट्य आणि संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या संस्थेमार्फत गेल्यावर्षीपासून कोल्हापूरच्या गायकांना सिंगिंग आयडॉलच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. यंदाही या स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला असून त्यात १२५ जणांनी सहभाग घेतला होता.

सहभागी झालेल्या गायकांनी प्राथमिक फेरीत ‘अधीर मन’, ‘गारवा’, ‘ऐ जिंदगी गले लगा ले’, ‘इश्क’,‘सुफियाना’, ‘चला जाता हूँ ’ आदी नवी जुनी गीते हार्मोनियम व तबला आणि कराओकेच्या साथीवर गायली. पहिल्या फेरीतून निवड झालेले दहा जणांची चार जूनला होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली. या गायकांना थेट आॅकेस्ट्रावर लाईव्ह सादरीकरण करावे लागणार आहे.

स्पर्धेचे परीक्षण डॉ. भाग्यश्री मुळे, महेश हिरेमठ यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष प्रसाद जमदग्नी, सचिव जितेंद्र देशपांडे, खजानिस मीना ताशिलदार, स्पर्धा प्रमुख केतकी जमदग्नी व अभिरूचीचे युवा रंगकर्मी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर