शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भांडी मांडून अभिनव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 18:01 IST

कोल्हा पूर : शिरोळ तालुक्यामध्ये महा पूर व अवकाळी पावसाने नागरिकांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे ...

ठळक मुद्देआपत्तीग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भांडी मांडून अभिनव आंदोलनशिरोळ तालुका आपत्तीग्रस्त घोषित करुन शासकिय सवलती देण्यांची मागणी

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यामध्ये महापूर व अवकाळी पावसाने नागरिकांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे या तालुक्याला आपत्तीग्रस्त तालुका घोषित करुन शासकिय सवलती द्याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी आपत्तीग्रस्त नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव धरणे आंदोलन केले.किसान दिनानिमित्त शिरोळचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी व शिरोळ नगरपरिषदेच्या नगरसेविका जयश्री धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आपत्तीग्रस्तांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी संसारोपयोगी भांडी व साहित्य रस्त्यावर मांडून, मूर्ती कारांनी महापूरात बुडालेल्या मुर्ती, तसेच शेतकऱ्यांनी कुजलेला ऊस घेवूनच अभिनव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की, अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुराने व अवकाळी पावसाने शिरोळ तालुक्यात मोठे नुकसान केले आहे. त्याचबरोबर पंचगंगा कृष्णा नदी प्रदुषणाचीही भर पडली आहे. त्याचा मानवी जीवनावर आणि शेतीवर विपरित परिणाम झाला आहे. याचा विचार करून शासनाने शासकीय सवलती दिल्या पाहिजेत. महापूरानंतर गायरान आणि गावठाण असा भेदभाव न करता सर्वांना समान नुकसान भरपाई द्यावी.

आंदोलनात सुधा जाधव, विजया कोळी, बाबूराव जगदाळे, प्रमिला कुंभार, प्रशांत रजपूत, भरत मिणचे, गणेश कुंभार, रचना माने, विद्या देशिंगेकर आदी सहभागी झाले होते.

शिरोळ तालुका आपत्तीग्रस्त घोषित करुन शासकिय सवलती द्या, या मागणीसाठी आपत्तीग्रस्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव धरणे आंदोलन केले. (छाया : नसीर अत्तार) 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूरfloodपूर