शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रह्मपुरी’वरील बांधकामांना अभय, शिवाजी पुलाच्या कामात कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:53 IST

पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला अडचण ठरणाऱ्या प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीवर अनधिकृत अनेक खासगी बांधकामे झाली, पण पुरातत्व विभाग या अनधिकृत बांधकामांना आजपर्यंत कधीही नोटीस बजावत नाही आणि सार्वजनिक काम असणाऱ्या पर्यायी शिवाजी पुलाला मात्र कायद्याचा धाक दाखवून कामात कोलदांडा आणत असल्याची चर्चा कोल्हापुरात सर्वसामान्य नागरिकांत सुरू आहे.

ठळक मुद्दे‘ब्रह्मपुरी’वरील बांधकामांना अभय, शिवाजी पुलाच्या कामात कोलदांडा ‘पुरातत्व’चा कारभार; सार्वजनिक कामात अडथळे

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला अडचण ठरणाऱ्या प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीवर अनधिकृत अनेक खासगी बांधकामे झाली, पण पुरातत्व विभाग या अनधिकृत बांधकामांना आजपर्यंत कधीही नोटीस बजावत नाही आणि सार्वजनिक काम असणाऱ्या पर्यायी शिवाजी पुलाला मात्र कायद्याचा धाक दाखवून कामात कोलदांडा आणत असल्याची चर्चा कोल्हापुरात सर्वसामान्य नागरिकांत सुरू आहे.ब्रह्मपुरी टेकडीखाली प्राचीन कोल्हापूरचा इतिहास गाडला असल्याने या टेकडीला विशेष महत्त्व आहे. १९४५-४६ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तज्ज्ञांनी व विद्यार्थ्यांनी या ब्रह्मपुरी टेकडीवर काही ठिकाणी उत्खनन केले. त्या उत्खननात पुरातत्व अवशेष आढळले. त्यामुळे या ब्रह्मपुरी टेकडी आणि टेकडीच्या १०० मीटर परिसरात उत्खनन करण्यास पुरातत्व विभागाने कायद्याने निर्बंध घातले आहेत.हाच आधार घेत पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला पुरातत्व विभागाचा अडथळा येत आहे. त्यामुळे गेल्याच वर्षी केंद्रीय पुरातत्व विभागाने ब्रह्मपुरी टेकडीपासून पुलापर्यंत अंतराचे मोजमाप केले असता ते १०० मीटरच्या बाहेर दिसून आले; पण त्यानंतरही पुरातत्व विभागाच्या निर्बंधाचा अडथळा पुलास आणला जात आहे.

पुलाचे हे सार्वजनिक काम असल्याने त्याला नोटिसा बजाविणाऱ्या पुरातत्व विभागाला त्या ब्रह्मपुरी टेकडीवर झालेली अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का? या टेकडीवर विद्युत खांब उभारताना तसेच बीएसएनएल कंपनीच्या केबलसाठी केलेल्या उत्खननाची कायद्याने अडचण आली नाही का? असे विविध प्रश्न नागरिकांतून चर्चीले जात आहेत. टेकडीवरील बांधकामाकडे पुरातत्व विभागाने नेहमीच डोळेझाक कारभार केला आहेच, तसेच त्यांना आतापर्यंत नोटीसही बजावली नसल्याची चर्चा आहे. 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर