शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: जयसिंगपुरात गव्याचा धुमाकूळ, तरुणावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 13:50 IST

घटनास्थळी नागरिकांनी गर्दी व गोंधळ केल्याने हा गवा जयसिंगपूर-नांदणी मार्गावरील एका शाळेच्या पाठीमागील ऊस शेतामध्ये गेला

जयसिंगपूर : जयसिंगपूरच्या शाहूनगर परिसरात गव्याने सोमवारी रात्री दहा वाजता धुमाकूळ घालत एका तरुणावर हल्ला केला. वन विभाग आणि प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गव्याचा माग धरला. सैरभैर झालेला हा गवा कचरे हौसिंग सोसायटी, शिवशक्ती कॉलनी परिसरात दिसेल तिकडे धावत सुटला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरुच होता. अखेर उसाच्या शेतातून गवा कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या दिशेने पसार झाला.  गेल्या दोन दिवसापासून हातकणंगले तालुक्यात नरंदे परिसरात दोन गवे दिसल्याचे वृत्त होते. त्यानंतर सोमवारी सकाळी शिरोळ तालुक्यातील जांभळी, नांदणी परिसरात एक गवा काही शेतकऱ्यांना दिसून आला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी व गोंधळ केल्याने हा गवा जयसिंगपूर-नांदणी मार्गावरील एका शाळेच्या पाठीमागील ऊस शेतामध्ये गेला असल्याचे दिसून आले.सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूर येथील वनविभागाचे पथक, प्राणीमित्र संघटनेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. अविनाश कांबळे यांच्या ऊस शेतीत गव्याने तळ ठोकल्याने त्या परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, गव्यापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचू नये, असे आवाहन वनविभागाच्या पथकाने केले आहे.  गवा शिरला ऊसातअविनाश कांबळे हे सायंकाळी वैरण घेवून घराकडे गेले होते. याच दरम्यान गवा त्यांच्या ऊस शेतीत गेला. कांबळे यांची ही शेती चारही बाजूने तारेच्या कुंपनेने बंदिस्त आहे. गवा शेतीत गेल्याचे समजताच कुपनचा दरवाजा त्यांनी बंद केला. लोकांची चाहूल लागल्यामुळे तो ऊस शेतीत गेला असावा, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर