शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लुटारुंनी लुबाडले; संसाराचा गाडा घेवून महिला घोडागाडी ओढत निघाली; कोल्हापुरातील तरुणाने मदतीचा हात देऊन मने जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 12:41 IST

सुरज पाटील हेरले: पंढरपूर येथील एक गरीब दाम्पत्य पोटाची खळगी भरण्यासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी काही अज्ञात तरुण लूटारूंनी ...

सुरज पाटीलहेरले: पंढरपूर येथील एक गरीब दाम्पत्य पोटाची खळगी भरण्यासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी काही अज्ञात तरुण लूटारूंनी त्यांना लुबाडले. यामुळे या दाम्पत्यांनी पुन्हा परतीची वाट धरली. संसाराचा गाडा घेवून घोडागाडीच्या एका बाजूला घोड्याचे शेंघरू तर दुसऱ्या बाजूला महिला ही गाडी ओढत होती. यावेळी कोल्हापुरातील हेरले येथील तरुण यासर मुल्ला यांनी या दाम्पत्यांची विचारपूस केली. घडलेला प्रसंग ऐकताच त्यांना धक्का बसला. त्यांनी या कुंटुंबाला आधार देत माणुसकी जपण्याचे मदतीचा हात दिला. त्यांच्या दातृत्वामुळे परिसरात कौतूक होत आहे.कोल्हापूर-सांगली फाटा ते हेरले मार्गे ते पंढरपूर दिशेला आपल्या घोडा गाडीने हे दोघे पती-पत्नी निघाले होते. संसाराचे साहित्य त्या गाडीवर, गाडीच्या एका जू वर एक घोड्याचे शेंघरू व दुसऱ्या बाजूला ती गरीब बाई जुवर व पाठीमागे त्याचा पती मागोमाग चालत निघाले होते. दरम्यानच यासर मुल्ला हे आपले काम आटोपून घरी येत होते. सांगली फाटा येथे त्याची नजर त्या गरीब दाम्पत्यावर गेली. यासर मुल्ला यांनी आपली गाडी बाजूला थांबवली व त्यांची विचारपूस केली. आपण कोठून आला व कोठे चालला, व एक शेंघरु कोठे आहे. यावेळी या दाम्पत्यांने घडलेला प्रसंग सांगताच ऐकून त्यांना धक्काच बसला.काही अज्ञात तरुण लूटारूंनी त्यांचे एक शेंघुरू व त्यांच्या जवळ असणारी रक्कम काढून घेतली होती. यासर मुल्ला यांनी प्रथम त्यांना आपल्या घरी आणून त्यांना जेवण दिले. आजूबाजू परिसरामध्ये त्यांच्या शेंघुरुची चौकशी केली. परंतु शेंघूरू काही मिळाले नाही. यासर याने आपल्यामध्ये व आपला मित्र शहाबाजमध्ये असलेले बिन दाती शेंघुरुचे पिल्लू स्वतः टेम्पो मध्ये घालून पैसे न घेता गाडीला जुपून दिले. यासर याने जे कार्य केले त्याची चर्चा परिसरमध्ये होत आहे. सर्वत्र त्यांचे समाजसेवेबद्दल कौतूक होत आहे.

त्या गरीब दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील निराशा घालवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले हाच खरा माझा आनंद - यासर मुल्ला, हेरले

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर