शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'महर्षी शिंदे यांच्याकडून समाजाला वैश्विक दृष्टी', शिवाजी विद्यापीठात विशेष टपालाचे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:06 IST

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महर्षी शिंदे यांनी महत्त्वाचे योगदान दिले

कोल्हापूर : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या विचारकार्यातून समाजाला वैश्विक दृष्टी दिली, असे गौरवोद्गार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. जनार्दन वाघमारे यांनी सोमवारी येथे काढले. छत्रपती शाहू महाराज आणि गोव्याचे टपाल विभागाचे पोस्टमास्तर जायभाये यांच्या हस्ते महर्षी शिंदे यांच्या नावच्या विशेष टपालाचे प्रकाशन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाघमारे बोलत होते.डॉ. वाघमारे म्हणाले, महर्षींनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. यातून समाजाला धर्मचिकित्सेची गरज आहे. भारतीय टपाल विभाग आणि शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन यांच्यातर्फे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. छत्रपती शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, टपाल विभागाचे अर्जुन इंगळे उपस्थित होते.गोवा विभागाचे पोस्टमास्तर आर. के. जायभाये म्हणाले, आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महर्षी शिंदे यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे, म्हणून त्यांचा टपाल विभाग गौरव करीत आहे. देशातील अनेक महनीय व्यक्ती, स्थळे, वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यासंदर्भात विशेष संदेश देण्यासाठी खात्याने वेळोवेळी अशी पाकिटे काढली आहेत. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, महर्षी शिंदे यांच्या कार्याचा अभ्यास होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे अध्यासन कार्यरत आहे. समाज परिवर्तनासाठी महर्षी शिंदे यांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.महर्षी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अध्यासन समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. राजन गवस, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. प्रकाश पवार, डॉ. अरुण शिंदे, सुरेश शिपूरकर, उपस्थित होते. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ