शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे प्रत्युत्तर, वाघ पळाला; बैलाचा जीव गेला, आजऱ्यातील आवंडी धनगरवाड्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 13:26 IST

जखमी अवस्थेत बैलाला वाघाने सोडून दिले

आजरा : आवंडी धनगरवाडा क्र. ३ (ता. आजरा) येथे पट्टेरी वाघाने पाळीव जनावरांवर हल्ला केला. त्यामध्ये धुळू धोंडिबा कोकरे यांचा बैल ठार झाला. ही घटना धनगरवाडा व सुळेरानच्या जंगल क्षेत्रात शनिवारी सायंकाळी घडली. दोन महिन्यांपूर्वी पट्टेरी वाघाने याच धनगरवाड्यावरील जगू कोकरे यांच्या बैलावर हल्ला केला होता. काल पुन्हा वाघाने हल्ला केल्यामुळे धनगरवाड्यावर भीतीयुक्त वातावरण आहे.धनगरवाड्यावरील धुळू कोकरे आपल्या जनावरांना चारण्यासाठी जंगलात गेले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पट्टेरी वाघाने जनावरांवर हल्ला केला. पट्टेरी वाघाने बैलाला पकडून ओढत नेले. यावेळी अन्य जनावरेही वाघावर धावून गेली व धुळू कोकरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे अर्ध्या तासानंतर त्याठिकाणी जखमी अवस्थेत बैलाला वाघाने सोडून दिले.त्यानंतर जखमी अवस्थेतच उपचारासाठी कोकरे यांनी बैलाला घरी आणले. रात्री उशिरा कोल्हापूर येथून वन विभागाची रेस्क्यू टीम धनगरवाड्यावरील जंगलात दाखल झाली. त्यांनी ड्रोन सोडून पट्टेरी वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. वन विभागाचे वनपाल संजय नीळकंठ, वनसेवक गंगाराम कोकरे, प्रवीण बेलवळेकर यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTigerवाघ