शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

अंध तरुणांचा संघ हिमालयातील ट्रेकसाठी रवाना; पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांचा समावेश

By संदीप आडनाईक | Updated: May 18, 2024 14:14 IST

कोल्हापूर : पुण्यातील स्वरूपसेवा, गिरीप्रेमी आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशन यांच्यातर्फे ‘ममता अंध अनाथ कल्याण केंद्र’ येथील २२ अंध ...

कोल्हापूर : पुण्यातील स्वरूपसेवा, गिरीप्रेमी आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशन यांच्यातर्फे ‘ममता अंध अनाथ कल्याण केंद्र’ येथील २२ अंध तरुणांचा संघ शुक्रवारी हिमालयाच्या सफरीवर रेल्वेने रवाना झाला. यामध्ये कोल्हापूर, कऱ्हाड, सातारा येथील तरुणांचा समावेश आहे. पुण्याहून हा संघ दिल्लीला पोहोचेल व तेथून हिमाचल प्रदेशातील ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा असलेल्या नग्गर या गावामध्ये तीन दिवस मुक्काम करणार आहे. दूरच्या रेल्वे प्रवासातील मजा, हिमालयातील थंड वातावरणाचा अनुभव, हिमालयातील एक छोटा ट्रेक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद हे तरुण या हिमालयातील सफरीदरम्यान घेणार आहेत. कोल्हापुरातील शरद पाटील, कऱ्हाड येथील प्रसाद शरद पाटील तसेच सातारा येथील गणेश हनुमंत निंबाळकर या अंध तरुणांचा या सफरीत समावेश आहे. गिरीप्रेमी संस्थेतील अनुभवी गिर्यारोहक, स्वरूपसेवा आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशनमधील स्वयंसेवक या अंध तरुणांना हिमालयाची ही अनोखी सफर घडवून आणण्यामध्ये मदत करणार आहेत. गिरीप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे आणि स्वरूपसेवा संस्थेचे अध्यक्ष अजित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची तयारी झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणेHimachal Pradeshहिमाचल प्रदेशTrekkingट्रेकिंग