शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नेत्यांच्या काव्य मैफलीत दोस्ती, कुस्ती, मान, भक्ती अन् शक्ती; तिकीटवाटप, गोंधळाला वैतागलेले नेते झाले रिलॅक्स

By समीर देशपांडे | Updated: January 1, 2026 18:38 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : सरते २०२५ साल संपताना कोल्हापूर महापालिकेच्या उमेदवारी निवडीची धामधूम सर्वच राजकीय पक्षांत सुरू होती. अशातच ...

समीर देशपांडेकोल्हापूर : सरते २०२५ साल संपताना कोल्हापूर महापालिकेच्या उमेदवारी निवडीची धामधूम सर्वच राजकीय पक्षांत सुरू होती. अशातच महायुतीच्या पत्रकार परिषदेच्या वेळी सोमवारी कुणीतरी ‘लोकमत’च्या वर्षअखेरीच्या काव्यमैफलीची आठवण करून दिली. यंदा या समन्वयाची जबाबदारी पालकमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांच्यावर देण्यात आली. त्याचवेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, ही मैफल माझ्या खात्याने शेंडा पार्कात नवीन चकचकित ऑडिटोरियम बांधले आहे, त्याच ठिकाणी घ्या. निरोप दिले गेले. अर्ज भरण्याची मुदत संपल्याने नेतेमंडळीही जरा रिलॅक्स होणार होती. तिकीट वाटपाच्या झटापटीत कावलेल्या नेत्यांनाही जरा विरंगुळा पाहिजे होता. अखेर शेंडा पार्कात मैफल ठरली.बुधवार, ३१ डिसेंबरची संध्याकाळ सहाची वेळ. नेत्यांच्या ४०००, ९००, १६००, ७४७४ अशा नंबरच्या गाड्या झोकात शेंडा पार्कात येऊ लागल्या. नवे करकरीत सभागृह फुल्ल झाले होते. नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आधीच जागा धरलेल्या. त्यात दक्षिण आणि कागलातील कार्यकर्ते अधिकच होते. व्यासपीठावर सर्व स्थानापन्न झाले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर उठले. त्यांनी स्वागत केले आणि कवितांना सुरूवात झाली. अर्थात, पहिला मान खासदार शाहू छत्रपतींना देण्यात आला. त्यानंतर प्रोटोकाॅलनुसार प्रत्येकाला संधी मिळणार होती. शाहू छत्रपतींनी व्यासपीठावर नजर फिरवली आणि ते म्हणाले,महायुती, महाविकास विषय निवडणुकीपुरता असावाकोल्हापूरचा विकास हाच अजेंडा डोक्यात असावासर्वांनी टाळ्या वाजवल्या.मग नंबर होता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा. ते म्हणाले,युवा ग्रामीणचा मी एक अध्यक्ष, दुवा मिळाला जनतेचाराधानगरी, भुदरगड, आजऱ्यामुळे मुकुट पालकमंत्रीपदाचा

मंत्री हसन मुश्रीफ उठले. ते सध्या अधूनमधून शायरी पेश करत असतात. पण यावेळी त्यांनी कविता म्हटली.

कधी दोस्ती, कधी कुस्ती याची मला जाण आहेत्यामुळेच मला महायुतीमध्ये मोठे स्थान आहेइतक्यात कागलातनं आलेल्या एकानं शिट्टी घातलीच.मग मंत्री चंद्रकांत पाटील उभे राहिले. सांगली करून रात्री पुण्याला पोहोचायचं आहे असे सांगून त्यांनी माझी कविता झाली की मी लगेच जाणार असल्याचे सांगून त्यांनी शाहू छत्रपतींची परवानगी घेतली आणि कविता सादर केली.

दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र, ही आमची शान आहेत्यामुळे देशात, राज्यात भाजपला मान आहेभाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजविल्या आणि मंत्री पाटील बाहेर पडले.खासदार धनंजय महाडिक कविता सादर करू लागले.अर्ज भरला, लगेच मागं घेतला, लई करू नका हवादोन पावलं मागे आलाय, कृष्णराज माझा छावा

महाडिक समर्थकांनी लगेच घोषणा सुरू केल्या.यानंतर नंबर होता खासदार धैर्यशील माने यांचा. ते म्हणाले,गेल्या वर्षी लोकसभेला, अडचण होती खरीठाण्याच्या एकनाथांनी, ताकद दिली बरी

म्हणून आमची निवडणुकीची होडी, लागली पैलतीरीटाळ्या वाजल्या. आमदार राजेश क्षीरसागर उठले. जाकीट ठिकठाक केले आणि म्हणाले,पालकमंत्रीपदाचा मी होतो दावेदारपण प्रकाशरावांना मिळाली संधी,महापालिकेत महायुतीची सत्ताहीच बदलाची नांदी.

आता सतेज पाटील यांचा नंबर होता. महायुतीच्या गोतावळ्यात ते उठून दिसत होते. ते उठले.

जिल्ह्यात १० विरूध्द १, तरी मोडला नाही कणापाठीवरती हात ठेवून, तुम्ही फक्त लढ म्हणाटाळ्यांचा कडकडाट झाला आणि नंबर आला विनय कोरे यांचा. ते शांतपणे उठले, बोलू लागले,कुठे पक्षनिष्ठा आणि कुठे राहिली आहे भक्तीज्यांना कोणी आधार नाही, त्यांना जनसुराज्य शक्ती

दाढीतल्या दाढीत हसत ते खाली बसले आणि राजेंद्र पाटील यड्रावकर उठले. ते म्हणाले,

शिरोळ तालुक्यातील लढाईत, अनेकांनी त्रास दिलापण जनतेच्या बळावर, विजयाचा लागला गुलाल मलाआता आमदार अमल महाडिक उठले. म्हणाले,आबिटकर, मुश्रीफ, क्षीरसागर यांच्यासह सर्वांचेशेंडा पार्कावर लक्ष आहे खासआयटी पार्क, रूग्णालये, प्रशासकीय इमारतींमुळेमाझ्या दक्षिणचा होणार जोरदार विकास

आमदार चंद्रदीप नरके उठले. त्यांनी महाडिक यांच्याच काही शब्दांचा आधार घेतला. म्हणू लागले,

माझ्या मतदारसंघावर मुश्रीफ साहेबांचे लक्ष आहे खासजरा हळू हळू जावुया, नको महायुतीला फासमुश्रीफ गालातल्या गालात खाली बसलेल्या राहुल पाटील यांच्याकडे बघत हसत होते.आमदार राहुल आवाडे उठले,

दादा, आण्णांच्या मार्गदर्शनाखालीकरेन इचलकरंजीचे नंदनवनफेब्रुवारीत मुलीचे लग्न आहेहेच सर्वांना निमंत्रणसर्वच नेत्यांनी टाळ्या वाजवत आवाडे आणि व्याही होणारे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे अभिनंदन केले.एवढ्यात चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील उभे राहिले. ते कविता सादर करू लागले,

दुर्गम, डोंगराळ चंदगड तालुक्यालाआधार एकच देवाभाऊप्रत्येकाच्या मदतीला धावून जातोहा आमदार शिवाभाऊआता नंबर होता आमदार अशोकराव माने यांचा. त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि ते कविता सादर करू लागले,सगळे विचारतात मला, की कोणत्या पक्षाचा मीजनसुराज्य, शिंदेसेना, भाजप तिघांचीही मला हमीयावर व्यासपीठावर एकच हशा पिकला आणि शेवटचे कवी म्हणून शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचे नाव पुकारले गेले. ते म्हणाले,

पाच जिल्ह्यातील गुरूंनी दाखवली मला वाटत्यांच्या पाठबळावर माझा आमदारकीचा थाटपुन्हा एकदा हशा पिकला, टाळ्या वाजल्या. इतक्यात मंत्री मुश्रीफ माईकवर आले. माझ्याच खात्याच्या सभागृहात आपण पहिल्यांदा आला आहात. तेव्हा सर्वांच्या चहापानाची व्यवस्था केली आहे. त्याचा आस्वाद घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आणि वर्षअखेरची ही मैफल संपली.(३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी शेंडा पार्क येथे न झालेल्या काव्यमैफलीचा हा वृत्तांत)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Leaders' Poetry Event: Friendship, Wrestling, Respect, Devotion, and Power

Web Summary : Kolhapur leaders relaxed at a poetry event after tense election preparations. Politicians showcased verses on unity, power, and local pride in a lighthearted atmosphere, celebrating camaraderie.