शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

...अन् मुस्लीम दाम्पत्य थेट व्यासपीठावर आले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऋण फेडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 22:06 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादिक गुलाब मकुभाई या जोडप्याकडून आभार पत्र स्विकारले आणि चिमुकलीला हातातही घेतले.

कोल्हापूर - शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरात होते. यावेळी व्यासपीठावर अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. एक मुस्लीम जोडपे त्यांच्या लहानग्या बाळाला घेऊन थेट व्यासपीठावर आले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. सुरुवातीला या जोडप्याला मुख्यमंत्र्यांची भेट का घ्यायची आहे याबाबत पोलिसांनी विचारणा केली. त्यानंतर सत्य कळताच प्रशासकीय सूत्रे वेगाने फिरली. 

कागल तालुक्यातील एक मुस्लीम जोडपे आपल्या चिमुकली सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा आग्रह करू लागले. बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी तात्काळ उपस्थित स्वयंसेवकांची भेट घालून दिली. भेट का हवी? कारण काय विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून त्यांच्या २६ दिवसांच्या चिमुकलीच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मिळाल्यामुळे आपल्या मुलीचे प्राण वाचले असं म्हटलं. त्यामुळे आम्हाला  कृतज्ञता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायचे आहेत असं सांगितले. 

त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी तात्काळ, शासन आपल्या दारी उपक्रमाचे राज्य समन्वयक डॉ अमोल शिंदे , अमित हुक्केरीकर आणि प्रभाकर काळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर या जोडप्याला व्यासपीठावर बोलवण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादिक गुलाब मकुभाई या जोडप्याकडून आभार पत्र स्विकारले आणि चिमुकलीला हातातही घेतले. कौतुकाने या चिमुकलीला न्याहाळत शेजारी असलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांस बाळाला दाखविले.निघताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाम्पत्याने मुलीचे नाव काय ठेवलं आहे ? या प्रश्नाला अतिशय भावनिक उत्तर देताना, तुमची आमच्या कुटुंबावर दुवा आहे. म्हणून आमच्या मुलीचे नाव हे आम्ही दुवाच ठेवणार असे चिमुकलीच्या आईने उत्तर दिले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे