शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
6
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
7
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
8
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
9
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
10
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
11
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
12
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
13
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
14
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
15
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
16
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
17
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
18
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
19
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...

दरमहा नऊ हजार रुपये किमान पेन्शन द्यावी, शाहू छत्रपती यांची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 16:50 IST

भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडावी

कोल्हापूर : ईपीएस ९५ अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तिवेतन दरमहा नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवून भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडले जावे, अशी आग्रही मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी लोकसभेत केली. पेन्शन महागाईपासून संरक्षित नाही, शिवाय गेल्या दहा वर्षांत त्यात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही, याकडेही सभाध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले.ईपीएस ९५ योजनेशी देशभरातील ७५ लाख निवृत्तिवेतनधारक संबंधित आहेत. पेन्शनधारकांची दयनीय अवस्था आहे. त्यांना किमान १४५१ रुपये इतके तुटपुंजे निवृत्तिवेतन दिले जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १२०० रुपये आहे. अशा परिस्थितीत सरासरी १४५१ रुपयांमध्ये जगायचे कसे, असा सवाल शाहू छत्रपती यांनी उपस्थित केला.आकडेवारी सांगते की "पेन्शन-फंड"मधील कॉर्पस् वाढला आहे. २०१७-१८ मध्ये तीन लाख ९३ हजार कोटी वरून २०२२-२३ मध्ये सात लाख ऐंशी हजार कोटी इतकी रक्कम वाढली आहे. सन २०२२-२३ मध्ये पेन्शन कॉर्पस्वर ५१ हजार कोटी रुपयांचे व्याज मिळाले; पण वाटप करण्यात आलेली १४ हजार ४०० कोटी पेन्शन तुटपुंजी होती. मिळालेल्या व्याजाची रक्कम दरमहा किमान पेन्शन नऊ हजारपर्यंत वाढवण्यासाठी पुरेशी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.नैसर्गिकरीत्या वृद्धापकाळ असलेल्या पेन्शनधारकांच्या उद्ध्वस्त जीवनाबद्दल सरकारची उदासीनता धक्कादायक आहे. घटनेच्या कलम ४१ मध्ये वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनांची तरतूद आहे आणि म्हणूनच ते केवळ वृद्ध निवृत्तिवेतनधारकांनाच नाही, तर आजारी आणि अपंगांनादेखील समाविष्ट करते. सरकारने वाजवी पेन्शन ही वृद्धापकाळातील सर्वांत महत्त्वाची सुरक्षा आहे हे जाणून घेतले पाहिजे. म्हणूनच या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि पेन्शनधारकांना न्याय द्यावा, अशी विनंती शाहू छत्रपती यांनी सभागृहात केली.शाहू छत्रपती यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली येथील जंतरमंतर येथे ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या धरणे आंदोलनास भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच लोकसभेत या विषयावर आवाज उठविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी मंगळवारी हा विषय उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPensionनिवृत्ती वेतनShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीlok sabhaलोकसभा