शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सुळकुड योजनेसाठी एकमत करा; इचलकरंजीच्या प्रलंबित प्रश्नांवर मुंबईत पार पडली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 12:36 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या सूचना

इचलकरंजी : इचलकरंजीसाठी दूधगंगा योजना मंजूर आहे. मात्र, त्याला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालाचे अवलोकन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांनी करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत निर्णयासाठी कार्यवाही करावी. तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आवाडे यांनी एकमतासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.सुळकूड पाणी योजनेसह मिळकतीला लागलेली शास्ती, झोपडपट्टी पुनर्वसन, यंत्रमाग व सायझिंग व्यवसायाला व्याज सवलत, आदी विषयांवर उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री मुश्रीफ, आमदार आवाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे उपस्थित होते.बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात उचित कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळाचा प्रश्नही मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. सन १९७३ साली अस्तित्वात आलेल्या नगररचना विभागातील मिळकतींना क-१ शेरा पडला आहे. या मिळकतधारकांना बांधकाम परवाना मिळत नसल्याने त्यांना संयुक्त कराच्या दुप्पट दराने शास्ती लागली असून, ती थकबाकी सुमारे ४६ कोटी आहे.त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर ही शास्ती माफ करण्यासाठी कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव ठेवावा. इचलकरंजी शहरात २४ घोषित झोपडपट्टी असून, तीन हजार ७६४ इतके झोपडपट्टीधारक आहेत. यापूर्वी झालेले पुनर्वसन वगळून इतर सर्व झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करा.साध्या यंत्रमागधारकांना त्यांच्या कर्जावर पाच टक्के व स्वयंचलित यंत्रमागधारकांना त्यांच्या कर्जावर दोन टक्के याप्रमाणे व्याजाची सवलत देण्यासाठी आवश्यक रकमेची माहिती घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वस्त्रोद्योग सचिव यांना दिले.राज्यातील सायझिंग-वार्पिंग उद्योगाकरिता पाच टक्के व्याज अनुदान दिल्यास शासनावर किती भर पडतो, याची माहिती घ्यावी. यंत्रमाग व यंत्रमाग व्यवसायाशी संबंधित सर्व कामगारांना लाभ देण्यासाठी सुतावर एक टक्का सेस लावण्याची आणि स्वतंत्र कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याची मागणी चोपडे यांनी केली. कामगार विभागाने हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर केल्यास त्यास तत्काळ मान्यता दिली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. यंत्रमागधारकांना १५ मार्च २०२४ पासून मागील प्रभावाने वीज सवलत देण्यात येईल.यावेळी खासदार धैर्यशील माने, अमित गाताडे, तौफिक मुजावर, चंद्रकांत पाटील, प्रकाश गौड, रफिक खानापुरे, पांडुरंग धोंडूपुडे, प्रल्हाद शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्हीसीद्वारे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPrakash Awadeप्रकाश आवाडेHasan Mushrifहसन मुश्रीफ