शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील वैदूंचे कोल्हापुरातील कणेरी मठावर होणार संमेलन, आयुर्वेदिक ज्ञानाच्या प्रसारासाठी नव्याने नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 16:13 IST

देशाच्या कानाकोपऱ्यातून चार हजारांवर वैदू येथे उपस्थित राहणार

कोल्हापूर : विविध आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करणारे देशभरातील वैदू सुमंगलम लोकोत्सवाच्या निमित्ताने कणेरी मठावर एकत्र येत आहेत. आरोग्य सुधारण्याबरोबरच उपचारासाठी आयुर्वेदाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने या संमेलनात विशेष नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून चार हजारांवर वैदू येथे उपस्थित राहणार आहेत. मठावरील सुमंगल महोत्सव १९ पासून सुरू होत आहे.भारतातील आयुर्वेदिक उपचार पद्धती जगभर प्रसिद्ध आहे. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. त्याच्या उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहारविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. आजही गावागावात पारंपरिक पद्धतीने उपचार करणारे वैदू आहेत. अतिशय दुर्धर रोगही बरा करण्याचा ते केवळ दावा करत नाहीत, तर रुग्ण बराही करतात. परंतु कागदोपत्री याचे पुरावे अथवा दस्तऐवजीकरण नसल्याने प्रचार आणि प्रसारावर मर्यादा येतात.कोणत्या रोगासाठी कोणत्या वनस्पतीचे औषध वापरता येईल, त्याचे प्रमाण काय असेल, ते वापरण्याची पद्धत काय, ते कुठे मिळेल, अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडे लिखित स्वरूपात नसतात. वैदूंना त्याचे ज्ञान असते, पण त्यांच्याकडे पदवी नसते. केवळ पारंपरिक ज्ञानावर आधारित ते उपचार करतात. सध्या गोवा आणि महाराष्ट्रामध्ये वैदूंची संघटना आहे. पण देशपातळीवर त्यांची व्यापक संघटना नाही. तशी संघटना करून देशभर या आयुर्वेदाचा प्रसार करण्याचा निर्धार कणेरी मठावरील या तीन दिवसीय वैदू संमेलनात करण्यात येणार आहे. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर व डॉ. अशोक वाली हे या संमेलनासाठी समन्वयाची जबाबदारी सांभाळत आहेत.

सध्या बाजारात विविध रोगांवर जी औषधे मिळतात, ती अतिशय महागडी आहेत. सर्वसामान्यांना ती न परवडणारी आहेत. अशावेळी भारतीय आयुर्वेदिक औषधांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी वैदूंचे हे संमेलन घेण्यात येत आहे. या निमित्ताने देशभरातील वैदूंचे संघटन करण्यात येणार आहे. - डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पती तज्ज्ञ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर