शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बाळूमामांच्या रथोत्सवाला भक्तांची प्रचंड गर्दी, शेकडो टन भंडाऱ्याची उधळण -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:45 IST

दुधाच्या घागरींचे निढोरीत जल्लोषी स्वागत

अनिल पाटीलमुरगूड : महाराष्ट्र- कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सदगुरू बाळूमामा भंडारा उत्सवातील महत्वाच्या रथोत्सवाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. उद्या , गुरुवारी होणाऱ्या महाप्रसादासाठी कर्नाटक सीमा भाग व राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रितपणे बाळूमामा रथातून विधीपूर्वक आदमापुरकडे नेण्यात आल्या.याची सुरुवात निढोरी ता. कागल येथे धार्मिक व भक्तीपूर्ण वातावरणात जल्लोषी मिरवणुकीने सुरू झाली. यावेळी बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा गजर करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. महाराष्ट्र- कर्नाटकातील १९ बग्गीतून आणलेल्या घागरी निढोरीच्या हनुमान मंदिरात जमा केल्या होत्या.याच ठिकाणी घागरींचे स्वागत व पूजन केले जाते.भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर निढोरीतून महाप्रसादासाठी न्यायचे. त्यामुळे या दूधाच्या घागरी निढोरीतून घेऊन जाण्याची दरवर्षीची प्रथा रुढ झाली आहे. आदमापुरातून आलेल्या बाळूमामा देवस्थानच्या रथाचे निढोरीमध्ये दुपारी आगमन झाले.

उद्या द्वादशी दिवशी दूधाने बाळूमामांना अभिषेक यात्रेसाठी आलेले भाविक वेदगंगेमध्ये स्नान करून मारुती देवालयामध्ये जमले. बाळूमामा देवस्थान समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी रथाचे पूजन केले. बग्गीतील दुधाच्या घागरी मानाच्या बैलगाडी व रथातुन दुपारनंतर आदमापुरकडे मार्गस्थ झाल्या. उद्या द्वादशी दिवशी सकाळी या घागरीतील दूधाने बाळूमामांना अभिषेक घालण्यात येईल. उर्वरित घागरीतील मेंढ्यांचे दूध महाप्रसादामध्ये वापरले जाणार आहे. प्रशासनाची चोख व्यवस्थाबाळूमामा भक्त सेवकांमार्फत सर्व भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक, कोकम सरबत पुरवण्यात आले. मुरगूड आणि गारगोटी पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख व्यवस्था केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं