शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

काळम्मावाडीच्या उजव्या कालव्यात पडला गव्यांचा कळप, सरवडे-उंदरवाडी परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 14:37 IST

सध्या कालव्याला पाणी असल्याने हे सर्व गवे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होते.

बोरवडे  : काळम्मावाडीच्या उजव्या कालव्यात गवारेड्यांचा अख्खा कळप पडल्याची घटना आज सकाळी साडे सात सरवडे-उंदरवाडीच्या कॕनॉल परिसरात घडली. या कळपात तब्बल १७ गवे आहेत. सध्या कालव्याला पाणी असल्याने हे सर्व गवे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होते. काही वेळाने हे गवे पाण्याबाहेर येत डोंगराकडे निघून गेले.याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, सरवडे - उंदरवाडी दरम्यानच्या ठोमणदरा नावाच्या शेताजवळ सकाळी सातच्या सुमारास पाणी पिण्यासाठी आलेला गव्यांचा अख्खा कळपच पाण्यात पडला. सध्या कालव्याला पाणी सोडल्याने, पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे सर्व गवे वाहत जात होते. कालव्याचे अस्तरीकरण न झालेल्या भागातून गवे बाहेर पडून जंगलाच्या दिशेने निघून गेले.सकाळी शेताकडे जाणाऱ्या उंदरवाडीतील शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यात पडलेले हे गवे दिसले. त्यांनी या गव्यांना सुमारे एक किमी अंतरावर असलेल्या लाकडी साकवापर्यंत हुसकावून नेले. या ठिकाणी अस्तरीकरण नसल्याने गव्यांना पाण्याबाहेर पडता आले. त्यानंतर हे गवे उंदरवाडीच्या भैरीच्या डोंगराकडे निघून गेले.दरवर्षी उंदरवाडी ते सरवडे  परिसरात गवे पाण्यात पडण्याच्या घटना वारंवार घडतात. या घटना टाळण्यासाठी येथे कायमस्वरुपी उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी मागणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर