शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पिसाळलेल्या कोल्ह्याचा सात शेतकऱ्यांवर हल्ला, ऊसतोड मजुरांनी भीतीने शेताकडे फिरविली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 17:45 IST

गणेशवाडी : कृष्णा नदीपलीकडे औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद या गावांमध्ये पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून, त्याने गेल्या चार दिवसांत या ...

गणेशवाडी : कृष्णा नदीपलीकडे औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद या गावांमध्ये पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून, त्याने गेल्या चार दिवसांत या परिसरातील सात शेतकऱ्यांचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.औरवाड, गौरवाड परिसरात ऊस तोडणी सुरू असून शेतकरीवर्ग या कामात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत या परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून, त्याने सात शेतकऱ्यांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. या शेतकऱ्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.औरवाड येथील अशोक मंगसुळे व अमर जगताप या शेतकऱ्यांचा या कोल्ह्याने चावा घेतला असून, गौरवाड व कवठेगुलंद येथील अन्य पाच शेतकऱ्यांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता तो तिथून प्रसार झाला असलातरी या परिसरामध्ये त्याचा अजून वावर असल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊस तोडणी करण्यासाठी ऊस मजूरही शेतात जाण्यास यामुळे तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची ऊस तोडणी खोळंबली असून, शेतकऱ्यांबरोबर ऊसतोड मजुरांमध्येही या पिसाळलेल्या कोल्ह्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याची घटना या परिसरात घडली होती. यानंतर आता पिसाळलेल्या कोल्ह्याने येथे धुमाकूळ घातल्यामुळे वनविभागाने या पिसाळलेल्या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग