शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील मजलेत ड्रायपोर्ट होणारच, खासदार धैर्यशील मानेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 12:12 IST

सांगलीचा प्रस्ताव आधी गेल्याने त्यांची कार्यवाही लवकर झाली असेल; पण तेथे झाले म्हणून कोल्हापुरातील नियोजित ड्रायपोर्ट होणार नाही हा समज चुकीचा

कोल्हापूर : मजले-तमदलगेच्या माळावर ड्रायपोर्ट उभारण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही अंतिम टप्प्यात आणली आहे. सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्टचा प्रस्ताव वेगळा असून, त्याचा कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या नियोजित ड्रायपोर्टवर कोणताही परिणाम होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत लवकरच मजलेत ड्रायपोर्टची उभारणी केली जाणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी दिली.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर महामार्गालगत ड्रायपोर्ट उभारण्यासाठी खासदार माने व सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यासाठी सांगलीतील सलगरे, रांजणी व कोल्हापूर जिल्ह्यातील मजले-तमदलगे येथील जागेची पाहणी करण्यात आली होती. नुकतेच सांगली जिल्ह्यात सलगरे येथे ड्रायपोर्ट उभारण्यासाठी उद्योग विभागाकडून जागा हस्तांतरित करण्यात आल्याने कोल्हापूर जिल्ह्याला डावलले की काय, अशी भावना निर्माण झाली. सांगली जिल्ह्यातील काहींनी समाजमाध्यमावर पोस्ट करत ड्रायपोर्ट खेचून आणल्याचे मत व्यक्त केल्याने संभ्रम निर्माण झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर निर्यात, फौंड्री उद्योग, वस्त्रोद्योगासाठी हे ड्रायपोर्ट उपयुक्त ठरणार आहे. शिवाय कोकण, कर्नाटकातील काही जिल्ह्यांसाठी ते लाभदायक आहे. मंत्री गडकरी यांनीच या ड्रायपोर्टला मान्यता दिली आहे. सांगलीचा प्रस्ताव आधी गेल्याने त्यांची कार्यवाही लवकर झाली असेल; पण तेथे झाले म्हणून कोल्हापुरातील नियोजित ड्रायपोर्ट होणार नाही हा समज चुकीचा आहे. सध्या मजलेतील वनसंपदेच्या जागेबाबत प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित केली जाईल, त्यानंतर ड्रायपोर्टच्या कामाची पुढील कार्यवाही होणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर