शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी

By संदीप आडनाईक | Updated: September 21, 2024 23:19 IST

चाळीस कर्मचारी करत आहेत मोजणी

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील दानपेटीत शनिवारपर्यंत १ कोटी ८४ लाख ४०७० रुपयांची रोख रक्कम जमा झाली आहे. वर्षभरात या दानपेटीत भाविकांकडून अंबाबाई चरणी जमा होणाऱ्या रोख रकमेची मोजदाद देवस्थान समितीने बुधवार दि. १८ सप्टेंबरपासून सुरू केले आहे. पहिल्याच दिवसाच्या मोजणीत मंदिर समितीला ४८ लाख ८१ हजार ५५५ रुपयांचे दान मिळाले. मंदिराचा गाभारा आणि परिसरात देवस्थान समितीने १२ दानपेट्या बसवल्या आहेत.

दरवर्षी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भाविक करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येत असतात. भक्तांकडून नवस, श्रद्धा आणि सेवेकरिता अशा विविध कारणांसाठी मंदिरातील दक्षिणा पेटीत भरभरून दान केले जाते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील या दानपेट्यातील रोख रक्कम मोजण्याचे काम बुधवारी दुपारी सुरू केले होते.

दानपेट्यात दहा, वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटांचे प्रमाण जास्त आहे. सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून या नोटा मोजून बंडल करून ठेवायचे काम सुरू केले होते. देवस्थान समितीतील ४० कर्मचारी, मंदिरातील सुरक्षा रक्षक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन कर्मचाऱ्यांकडून हे दान मोजले जात आहे. काही भक्तांनी दान पेटीत सोने, चांदीदेखील टाकले आहेत. ते वेगवेगळे करून त्याची शुद्धता तपासून त्याचेदेखील वजन आणि आकडेवारी काढण्यात येणार आहे. पैसे मोजण्यासाठी मशिन देखील आणले होते.

दोन पेट्या मोजणे बाकी

बुधवारी पहिल्या दिवशी पहिल्या दानपेटीत ४८,८१,५५५, गुरुवारी दुसऱ्या दानपेटीत ७६,७९,०३०, शुक्रवारी चौथ्या दानपेटीत २,२३,५११, पाचव्या पेटीत २,०७,१९१, सहाव्या पेटीत २,३७,२०२, सातव्या पेटीत २३,५७,६७२, आठव्या पेटीत २,९६,१९१ रुपयांचे दान मिळाले. शनिवारी तिसरी पेटी उघडण्यात आली, त्यात ४,८९,६१०, तसेच ११ व्या पेटीत १३,५४,५३५ आणि १२ व्या पेटीत ६,७७,५७३ रुपयांचे दान मोजले. अजून दोन पेट्यांमधील दान मोजणे बाकी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर