शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

Kolhapur: सीपीआरमधील ५ कोटींची खरेदी; ठेकेदार लिंबेकरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:47 IST

‘लोकमत’ने प्रकरण आणले होते उघडकीस; मुर्दाड शासन यंत्रणेला आली जाग

कोल्हापूर : बोगस कागदपत्रांच्या आधारे सीपीआरला ४ कोटी ८७ लाख रुपयांच्या सर्जिकल साहित्य पुरवठा करणारा ठेकेदार मयूर वसंत लिंबेकर (रा. गणपती मंदिरजवळ, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर) यांच्याविरोधात गुरुवारी (दि. १७) रात्री अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. मुर्दाड शासन यंत्रणा हा गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत होती. परंतु ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरल्याने अखेर हा गुन्हा दाखल झाला.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. लिंबेकर यांनी ठेका मिळवण्यासाठी मुलुंड येथील ईएसआयएस हॉस्पिटलचे बनावट दरकरार पत्र सादर केले. तसेच कोलोप्लास्ट कंपनीचे तारीख नमूद नसलेले बनावट शिक्का व सही असलेले विलिंगनेस लेटर आणि याच कंपनीचे बनावट सही, शिक्क्याचे बनावट प्राधिकृत पत्र सादर करून हा ठेका मिळवला होता.त्यानुसार ४ कोटी ८७ लाख ३० हजार ५०० रुपयांचे स्ट्रराइल ड्रेसिंग पॅड हे साहित्य पुरवठा करण्यात आले. या बनावट कागदपत्रांबद्दल त्याच्याविरोधात ही फिर्याद देण्यात आली असून, शासनाच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक केसरकर पालकमंत्री असताना हा खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यावेळी राहुल रेखावार जिल्हाधिकारी होते, तर डॉ. प्रवीण दीक्षित हे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते. आता केवळ ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या साखळीत सहभागी असणाऱ्यांचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.अशी झाली खरेदी प्रक्रिया

  • ऑक्टोबर २०२२ला अशा पद्धतीचे साहित्य खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
  • यासाठी एकूण १२ कोटी १९ लाख रुपयांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला.
  • डिसेंबर २०२२ला हा प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली.
  • डिसेंबर २०२२, जानेवारी २३ आणि फेब्रुवारी २३ रोजी जिल्हा नियोजनकडून प्रशासकीय मान्यता.
  • याच दरम्यान सीपीआरला साहित्य पुरवठा
  • या ठेकेदाराला १४ फेब्रुवारी २०२३ला सर्व बिल अदा.

असे आले प्रकरण उघडकीसया ठेक्याबाबत माहिती अधिकारामध्ये मुलुंड रुग्णालयाला पत्र लिहिण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून अशा कोणत्याही प्रकारचे दरपत्रक नमूद तारखेस देण्यात आले नसल्याचे लेखी देण्यात आले आणि इथूनच हा घोटाळा उघडकीस आला.

१८,१९, २०,२१ जुलै रोजी चार भागांची मालिका लिहून ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणले.याची दखल घेत चौकशी समितीची वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा.चौकशी समितीकडून गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब, उच्चस्तरीय चौकशीची शिफारस.पुन्हा ‘लोकमत’कडून मंत्र्यांना विचारणागुन्हा दाखल करण्याची हसन मुश्रीफ यांच्याकडून घोषणाटाळाटाळ करत करत अखेर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल

नेत्यांशी लागेबांधेहा ठेका मिळवण्यासाठी आमदारांचे पत्र घेणे, गैरकारभार उघडकीस आला तरी मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर फलकांद्वारे शुभेच्छा देणे, यासाठी युवाशक्तीच्या पदाधिकाऱ्याचे सहकार्य घेऊन त्यावर खासदार, आमदार यांची छायाचित्रे वापरणे आणि या माध्यमातून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न लिंबेकर याने केला. परंतु तरीही अखेर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय