शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागातील ९० टक्के  एस. टी. वाहतूक बंद, संपामुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 11:38 IST

कोणत्याही संघटनेने पाठिंबा दिलेला नसला तरी कोल्हापूर विभागातील ९० टक्के वाहतूक व्यवस्था शुक्रवारी मध्यरात्री पासून बंद आहे. एस.टी बस संपामुळे प्रवाशांचे हाल झाले.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातील ९० टक्के  एस. टी. वाहतूक बंद, संपामुळे प्रवाशांचे हालकर्मचारी संपावर, पगार वाढ अमान्य; कोणतीही संघटना थेट सहभागी नाही

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाने चार वर्षांच्या करारापोटी चार हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. मात्र, ही वेतनवाढ काही एस. टी. कर्मचाऱ्यांना अमान्य असल्याने शुक्रवारपासून स्वत:हून ते संपात सहभागी झाले आहेत. या संपाला कोणत्याही संघटनेने पाठिंबा दिलेला नसला तरी कोल्हापूर विभागातील ९० टक्के वाहतूक व्यवस्था शुक्रवारी मध्यरात्री पासून बंद आहे. एस.टी बस संपामुळे प्रवाशांचे हाल झाले.राज्य परिवहन महामंडळाने चार हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ दिली. मात्र, ती फसवी असून, याला विरोध करताच आहे. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर दबाब आणला जात असल्याचा आरोप करत असल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून कोणत्याही संघटनेशी बांधील न राहता संपात सहभागी होण्याचा निर्णय काही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

याबाबत सोशल मिडीयवर प्रचार - पसार करण्यात आला. त्यानुसार मध्यरात्री पासून कोल्हापूर विभागातील कर्मचारी संपात सहभागी होवू लागलेत.मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकत्र येवून त्यांनी शांतपणे संपात सहभागी आहोत, हे दर्शवित होते. अचानक झालेल्या संपामुळे प्रवाशांच्या मात्र हाल झाले.

मे महिन्याची सुट्टी संपत आल्याने प्रवाशी परतीचा प्रवास करत असल्याने मध्यवर्ती बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यामध्ये एस.टी बस संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. तरी परगावचे प्रवाशी बसस्थानकांवर अडकून पडले. यांचा फायदा खासगी बस वाहतूकरदारांनी घेतल्याचे चित्र बसस्थानक परिसरात पाहण्यास मिळाले.

सकाळी अकरा पर्यंत फक्त ३३ गाड्या रस्त्यांवरकोणताही संघटनेचा यामध्ये सहभागी नसला तरी कामगारांनी उत्सफुर्तेपणे संपाला पाठिंबा दिल्याचे चित्र कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळाले. ७१९ गाड्यापैकी फक्त ३३ गाड्या पुणे, बेळगाव यासह ज्या ठिकाणी प्रवासी जादा आहेत. त्या मार्गावर गाड्या सोडण्यात आल्या.

मात्र एस.टी. कामगार सेना व महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या पदाधिकारी संपात सहभागी न होता. कामवर हजर होते. प्रशासन त्यांच्या मार्फत गाड्याचे नियोजन करताना दिसून येत होते. 

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर