शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘धनगर आरक्षणा’ साठी ८ सप्टेंबरचा ‘अल्टिमेटम’, कोल्हापुरात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:13 IST

धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन सुरू ठेवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देसमस्त धनगर समाजातर्फे सरकारला इशारा : सरकारचा वेळकाढूपणा : रानगे ‘यळकोट यळकोट...जय मल्हार’ च्या घोषणांनी परिसर दणाणला

कोल्हापूर : धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन सुरू ठेवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

हे सरकार वेळकाढूपणा करत समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप बबन रानगे यांनी केला.धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी़, या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर समाजातर्फे आंदोलन हाती घेतले आहे़ त्यानुसार कोल्हापूर समस्त धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शासनाच्या निषेधार्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आंदोलनस्थळी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन अहिल्यादेवींची प्रतिमा व निवेदन सादर केले. भर पावसात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले धनगर समाजबांधव ‘आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे’, ‘यळकोट, यळकोट...जय मल्हार’ असा जयघोष आणि भंडाऱ्यांची उधळण करत या आंदोलनात सहभागी झाले.बबन रानगे म्हणाले, सरकारने २०१४ च्या निवडणुकीच्या बारामती येथक्षल जाहीर सभेत सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्येच आरक्षणाबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते; परंतु चार वर्षे झाली तरी यावर कोणताच निर्णय झालेला नाही. सरकार वेळकाढूपणा करत असून त्यांच्याकडून समाजाची फसवणूक सुरू आहे; यामुळे सरकारवर समाजाचा विश्वास राहिलेला नाही.बयाजी शेळके म्हणाले, घटना पुनर्विलोकन आयोगाची अध्यक्ष एन. वेंकटचलय्या यांनी २००३ मध्ये महाराष्ट्रातील सह्याद्री अतिथी गृह येथे येऊन जातीच्या नावातील घोळाबाबत सुनावणी घेऊन दुरुस्ती केली; त्यानुसार धनगड/धनगर अशी नोंद करण्यात आली; परंतु आजतागायत त्यानुसार अंमलबजावणी झालेली नाही.

प्रकाश पुजारी म्हणाले, आरक्षणासंदर्भात ८ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेऊन अनुसूचित जमातीचे दाखले तरुणांना मिळाले नाही तर वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करून मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवून सोडू.आंदोलनात एन. डी. बोडके, उदय डांगे, बाबूराव बोडके, सिद्धार्थ बन्ने, नारायण मोटे-देसाई, विठ्ठल भमांगूळ, शहाजी सिद, हरी पुजारी, विश्वास गावडे, विकास घागरे, राजेश बाणदार, नागेश पुजारी, विठ्ठल शिनगारे, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामkolhapurकोल्हापूर