एकनाथ पाटील --कोल्हापूरमहसूल, पोलिस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगरभूमापन, बँका, रजिस्ट्रेशन, आदी कार्यालयांत कामाच्या बदली लाच स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गेल्या तीन वर्षांत ८९ गुन्हे दाखल करून १५८ जणांना अटक केली. त्यापैकी दोन वर्षांत १७ जणांना शिक्षा झाली. नव्या वर्षात हेर्ले (ता. हातकणंगले) येथील मंडल अधिकारी स्मिता रघुनाथ कुपटे यांना दहा हजार रुपये लाचेप्रकरणी अटक करून खाते उघडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्यात पुणे, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, नागपूर, मुंबई अशी आठ परिक्षेत्र आहेत. यात पुणे परिक्षेत्रातील कोल्हापूर विभागाने सर्वाधिक कारवाई केल्याचे पोलिस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी सांगितले. या विभागामध्ये सन २०१४-१५ मध्ये ६२, तर सन २०१६ मध्ये २७, असे सुमारे ८९ गुन्हे दाखल झाले होते. गेल्या तीन वर्षांत ४५ गुन्हे निकाली होऊन १७ आरोपींना शिक्षा झाली. ४४ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली होण्याची गरज आहे. त्यासाठी जलदगती न्यायालयाची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. +२०१६ मधील दाखल गुन्हे पोलिस धनाजी महादेव पाटील, एजंट राजेंद्र केशव बोंगार्डे (हुपरी पोलिस ठाणे), कनिष्ठ लिपिक विनायक आप्पासाहेब पाटील, वरिष्ठ लिपिक विकास दत्तात्रय लाड (जिल्हा परिषद), लिपिक दादासो जिनाप्पा शेळके (तहसीलदार करवीर), कर अधिकारी राजू अहमद मुल्ला (इचलकरंजी नगरपालिका), परिरक्षण भूमापक संजय मारुती कोंढावळे (नगरभूमापन कार्यालय बिद्री, ता. कागल), प्रशासक प्रकाश शामराव सावर्डेकर (लालबहाद्दूर हौसिंग सोसायटी, शिरोली, ता. हातकणंगले), पुरवठा निरीक्षक प्रकाश आप्पासो जाधव (तहसीलदार गडहिंग्लज), पोलिस राजाराम ईश्वरा सूर्यवंशी (भुदरगड), पोलिस मानसिंग पंडितराव चव्हाण व संभाजी शिवाजी कवडे (दोघे, कागल पोलिस ठाणे), सहायक कामगार आयुक्त सुहास रामचंद्र कदम, लघुटंकलेखक संजय जगन्नाथ पाटील (सहायक कामगार आयुक्त), मंडल अधिकारी कुमार शिशुपाल कोळी (हुपरी), कालवा निरीक्षक प्रकाश तुकाराम मोहिते (हिरण्यकेशी पाटबंधारे, गडहिंग्लज), जवान सुहास काशिनाथ शिरतोडे, एजंट संदीप शामराव खोत, शामराव ईश्वरा पाटील (राज्य उत्पादन शुल्क विभाग), तलाठी आकांक्षा भाऊसाहेब ढेरे (इंगळी, ता. हातकणंगले), पोलिस विजय चंद्रकांत बेडगे (शहापूर-इचलकरंजी), पोलिस सुरेश महादेव कबीर (शिरोली एमआयडीसी), आरोग्य सहायक नंदकुमार शंकर कोळी (जिल्हा परिषद), उपअभियंता मोहन राजाराम सोनवणे (पंचायत समिती हातकणंगले), लिपिक शशिकांत महादेव बागी (नगरपालिका इचलकरंजी), पोलिस विलास शंकराव देसाई (नेसरी), पोलिस निरीक्षक सर्जेराव बाबूराव गायकवाड, पोलिस नाईक विष्णू रमेश शिंदे (शिवाजीनगर-इचलकरंजी), अल्पबचत अधिकारी जयदीप चंद्रकांत सावदेकर (कोल्हापूर विभाग), खासगी वकील माणिक नामदेव डवंग (पन्हाळा), पोलिस नाईक वैशाली आण्णासो कांबळे (इचलकरंजी), सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत यशवंत सावंत, पोलिस आप्पालाल आब्बास लालूप्रसाद (हुपरी), वरिष्ठ सहायक चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर (शिक्षक विभाग, जिल्हा परिषद), पोलिस प्रभावती भूपाल सावंत (इचलकरंजी). बेहिशेबी मालमत्ता शासकीय अधिकारी किंवा राजकीय व्यक्ती आणि उत्पन्नापेक्षा बेहिशेबी मालमत्ता मिळविली असेल. त्याबाबत तक्रारी दाखल झाल्यास त्यांचीही चौकशी होऊन कारवाई केली जाते. त्यामध्ये कोकण पाटबंधारे विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब भाऊसाहेब पाटील यांच्यावर कारवाई केली. दोन वर्षांत शिक्षा झालेले आरोपीसतीश गणपतराव सूर्यवंशी (लिपिक, हातकणंगले तहसीलदार कार्यालय), तलाठी बाळू भूपाल कोळी, कोतवाल बाबूराव बाजीराव भोसले (पाचगांव, ता. करवीर), राजेंद्र केशव बिडकर (लिपिक, भूमीअभिलेख पन्हाळा), सुभाष पांडुरंग जाधव (तलाठी, घुणकी-चावरे, ता. हातकणंगले), विठ्ठल लक्ष्मण पाटील (लिपिक, जिल्हा पुनर्वसन अधिकारी), सुनील जनार्दन कुंभार (तलाठी), भगवंता तुकाराम चांदेकर (लिपिक, शाहूवाडी तहसीलदार), सुभाष गजानन कोळी (तलाठी, भादोले, ता. हातकणंगले), जयश्री श्रीपाद कुलकर्णी (लिपिक, पंचायत समिती, हातकणंगले), बाबासो चौगोंडा पाटील (शिक्षण विस्तार अधिकारी, हातकणंगले), रत्नाकर दत्तात्रय जोशी (कनिष्ठ अभियंता, महावितरण, कोगे), सुरेश रामचंद्र लोहार (पोलिस नाईक, करवीर), शैलेंद्र गोविंद वाळके (पोलिस कॉन्स्टेबल, राजारामपुरी), तुकाराम धोंडिबा पवार (सहा. फौजदार, पन्हाळा), सागर रामचंद्र शिंगे (कनिष्ठ लिपिक, प्रादेशिक परिवहन कार्यालय), एजंट सचिन जयसिंगराव पाटील, कुमार भीमराव पवार (पोलिस हवालदार, शिवाजीनगर-इचलकरंजी), संजय गोविंद जाधव (पोलिस नाईक, करवीर).
तीन वर्षांत ८९ गुन्हे; १५८ जणांना अटक
By admin | Updated: January 20, 2017 00:06 IST