शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'संविधानाविरोधातील शत्रूंचा ताकदीने मुकाबला करणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 15:46 IST

कोल्हापूर : संविधानाविरोधातील ज्या धर्मांध शक्ती शत्रू आहेत. त्यांच्याशी ताकदीने मुकाबला करण्याचा निर्धार ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे ...

कोल्हापूर : संविधानाविरोधातील ज्या धर्मांध शक्ती शत्रू आहेत. त्यांच्याशी ताकदीने मुकाबला करण्याचा निर्धार ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचारांच्या वारसदारांनी बुधवारी सकाळी केला. कॉम्रेड पानसरे यांच्या ८८ व्या जयंतीदिनी त्यांना मॉर्निंग वॉकने अभिवादन करण्यात आले.येथील सागरमाळ आयडियल सोसायटीमधील त्यांच्या निवासस्थानी सकाळी आठ वाजता डाव्या चळवळीतील कार्यकर्ते, त्यांच्या विचारांचे वारसदार जमले. तेथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कॉम्रेड पानसरे यांचे विचार पुढे घेऊन जाणे हेच आपले सर्व कार्यकर्त्यांचे ध्येय, उद्दिष्ट आहे. सध्या धर्मांधता आणि हिंसा देशभरात वाढली आहे. त्याचा मुकाबला कॉम्रेड पानसरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणून ताकदीने करण्याचा निर्धार आम्ही जयंतीदिनी केला असल्याचे डॉ. मेघा पानसरे यांनी सांगितले.

दरम्यान, आयडियल सोसायटीपासून सुरू झालेल्या मॉर्निंग वॉकची वि. स. खांडेकर विद्यालयाजवळील पानसरे यांच्या नियोजित स्मारकाजवळ सांगता झाली. ‘कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे’, ‘पानसरे यांच्या मारेकऱ्यांना न पकडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, आदी घोषणांनी परिसर दुमदुमला. नामदेव गावडे, सुरेश शिपुरकर, एस. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर सदाशिव निकम, कृष्णात स्वाती यांनी स्फूर्तीदायक पोवाडे गायले. रघुनाथ कांबळे, अनिल चव्हाण, स्वाती कृष्णात, आनंदराव परूळेकर, सुभाष वाणी, उमेश सूर्यवंशी, मुकुंद कदम, राजा यादव, संजय सदलगकर, मल्हार पाटील, इस्माईल शेख, सुरेश सावंत उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरे