शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ८७ गावांमध्ये अंत्यसंस्काराला स्मशानभूमीच नाही, पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक गावे

By समीर देशपांडे | Updated: July 22, 2025 17:16 IST

जागा मिळेना, प्रश्न सुटेना, शेवटच्या प्रवासाची चिंता मिटेना

समीर देशपांडेकोल्हापूर : प्रत्येकाच्या आयुष्याची अखेर ठरलेली आहे; परंतु हा शेवटचा प्रवासही सुखाचा व्हावा, अशी इच्छा सर्वांचीच असते; परंतु जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ८७ गावे आणि वाड्यांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नाही. त्यामुळे या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा मिळेना, प्रश्न सुटेना आणि शेवटच्या प्रवासाची चिंता मिटेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रत्येक गावाला, वाडीला, वस्तीला स्मशानभूमी गरजेची असते; परंतु अनेक ठिकाणी जागांची अडचण असल्याने स्मशानभूमीच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वैयक्तिक शेतामध्ये बहुतांशीवेळा अंत्यसंस्कार करण्यात येतात; परंतु अशावेळी अनेक मर्यादा येतात. भावकीमध्ये जर मतभेद नसतील तर प्रश्न निर्माण होत नाहीत; परंतु अनेकदा गावपातळीवर ज्यांची गुंठाभरही जमीन नाही अशांची कुचंबना होते. गेली अनेक वर्षे या गावांमध्ये स्मशानभूमी नाही, ही वस्तुस्थिती आहे; परंतु याबाबत काही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ प्रशासकीय पातळीवर हा प्रश्न सुटणारा नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे.मंत्री, आमदार आणि खासदार यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. कारण अनेकदा जागा मिळवताना स्थानिक पातळीवर अडचणी येतात. अशा प्रकरणांमध्ये त्या-त्या परिसराच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले तर हे प्रश्न सुटू शकतात. अनेक तालुक्यांतील मोठ्या गावांमध्येही स्मशानभूमी नसल्याचे दिसून येते. वास्तविक स्मशानभूमी आणि तिकडे जाणारे रस्ते यासाठी निधीची उपलब्धता सहज होत असताना इतक्या वाड्या- वस्त्यांवर आणि गावांमध्ये स्मशानभूमी नसणे भूषणावह नाही.

स्मशानभूमी नसलेली तालुकावार गावे

  • राधानगरी - २१
  • आजरा - १६
  • भुदरगड - १३
  • शाहूवाडी - १२
  • करवीर - १०
  • चंदगड - ०९
  • शिरोळ - ०५
  • हातकणंगले - ०१
  • एकूण - ८७

खास योजना तयार करण्याची गरजया सर्व गावांमध्ये जर स्मशानभूमी करायची असेल तर त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून योजना तयार करण्याची गरज आहे. त्यातून जागा घेण्यासाठी अनुदान देऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर स्मशानभूमी कशी करता येईल, याकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी खास लक्ष देऊन तशी योजना जाहीर करण्याची मागणी होत आहे. त्यांच्याच मतदारसंघात स्मशानभूमी नसलेली गावे अधिक आहेत.