कोदाळी पैकी बांदराईवाडा (धनगरवाडा), ता. चंदगड येथील पंढरपूरला देवदर्शनाला निघालेल्या नागरिकांच्या झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्यांमुळे बांदराईसह संपूर्ण चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली. अशा प्रसंगी शिक्षक समितीचे दातृत्वाचे हात पुढे आले. चंदगड तालुका शिक्षण समितीच्या वतीने ८६ हजार रुपये इतकी मदत करण्यात जमा केल्याची माहिती अध्यक्ष धनाजी पाटील यांनी दिली. अपघातात जखमी झालेल्यांना उपचार करण्यासाठी विठ्ठल लांबोर यांच्याकडे रोखीने वीस हजार रुपये दिले. तर अपघातामध्ये मयत झालेल्या अनाथ मुलामुलींना पुढच्या शिक्षणासाठी भारती जानू लांबोर (२५००० ठेव पावती), धोंडिबा बबन लांबोर (१५००० ठेव पावती), कोमल बाळू लांबोर (१०,००० ठेव पावती) जखमी रोहित कांबळे (रा. कलिवडे याला १५,५०० रोखीने) अशी मदत शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आली. यावेळी अध्यक्ष धनाजी पाटील, सरचिटणीस एन. व्ही. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील, राजू जोशी, मारुती चिंचणगी, गोविंद चांदेकर ,प्रकाश रामू पाटील, रामचंद्र तुप्पट, विनायक गिरी, पाटकर, ज्योतिबा पाटील, अशोक चिंचणगी, सुभाष गवस, अप्पया पिटुक, सचिन पिटुक, ज्योतिबा पिटुक, सतीश माने, पुंडलिक चोपडे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी:-- बांदराई धनगरवाडा, ता. चंदगड येथील पंढरपूर येथील अपघातामध्ये जखमी व मयतांच्या वारसांना शिक्षक समितीच्या वतीने आर्थिक मदत देताना तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, गोविंद चांदेकर, नवनीत पाटील, माने, पिटुक आदी.