शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

८१ हजार शेतकऱ्यांना हवी दोन टप्प्यांत एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:41 IST

राजाराम लोंढे । कोल्हापूर : चौदा दिवसांत उसाची एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असले तरी आता दोन-तीन टप्प्यांत एफआरपी ...

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : चौदा दिवसांत उसाची एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असले तरी आता दोन-तीन टप्प्यांत एफआरपी देण्यासाठी शेतकऱ्यांनीच संमती दिल्याने साखर कारखाने कायद्याच्या कचाट्यातून सुटले आहेत. ऊसनोंदीचा करार करतानाच सर्वच कारखान्यांनी तसे लेखी लिहून घेतले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील तब्बल ८१ हजार ७५० शेतकºयांनी संमती दिल्याने कारखाने सुटले. मात्र, शेतकरी अडकणार, हे निश्चित आहे.शेतकºयांना उसाची निघणारी रक्कम विनाकपात एकरकमी १४ दिवसांत देण्याचा कायदा १९६६ साली केंद्र सरकारने केला असला तरी त्याची खºया अर्थाने अंमलबजावणी शेतकरी संघटनांच्या उठावानंतरच झाली. तोपर्यंत कारखान्यांचा हंगाम संपल्यानंतर पहिला हप्ता, गौरी-गणपतीला ५०-७५ रुपयांचा दुसरा हप्ता आणि दुसरा हंगाम सुरू होण्याअगोदर अंतिम बिल दिले जायचे. मात्र, २००४ पासून उसाची किमान किंमत वेळेत देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. शेतकºयाचा ऊस गाळपासाठी उचल केल्यापासून १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’प्रमाणे त्या उसाचे पैसे देणे बंधनकारक आहे. या कालावधीत पैसे न दिल्यास पैसे देईपर्यंतच्या काळात या रकमेवर १५ टक्क्यांप्रमाणे व्याज शेतकºयांना द्यावे लागते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ‘स्वाभिमानी’सह ‘आंदोलन अंकुश’, ‘जय शिवराय’ या संघटनांनी कायद्याचा आधार घेऊन साखर कारखान्यांची कोंडी केली. एकरकमी एफआरपीच नव्हे, तर १४ दिवसांनंतर होणारे व्याज वसुलीसाठी संघटनांनी साखर आयुक्तांकडे तगादा लावल्यानेच गेल्या हंगामात सर्वाधिक कारखान्यांवर ‘आरआरसी’च्या कारवाई झाल्या.कायदा आणि कारवाईच्या धसक्याने कारखान्यांनी ‘एफआरपी’ दोन-तीन टप्प्यांत देण्यासाठी शेतकºयांकडून संमंतीपत्रे घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ कारखान्यांकडील ४५ हजार ९५५ शेतकºयांनी, तर सांगली जिल्ह्यातील १२ कारखान्यांकडील ३५ हजार ७९५ शेतकºयांनी संमतीपत्रे दिली आहेत. विशेष म्हणजे सांगलीतील सर्वच कारखान्यांनी संमतीपत्रे घेतली आहेत. एफआरपीचे तुकडे केल्याने कर्जाचे हप्ते थकणार, त्यातून व्याज फुगणार आणि त्याचा फटका शेतकºयांना बसणार आहे. त्यामुळे संमतीपत्राने कारखाने सुटले मात्र शेतकरी अडकणार, हे निश्चित आहे.-------------------------------------मागील हंगामापासून ‘हा’ प्रयोगमागील हंगामात शेतकरी संघटनांचा प्रभाव असलेल्या शिरोळ तालुक्यातील कारखान्यांनी संमतीपत्रांचा प्रयोग केला होता. त्याचे लोण आता जिल्ह्यात पसरले आहे.------------------------------------कारखानानिहाय संमती दिलेल्या शेतकºयांची संख्या :भोगावती १२,०७१राजाराम २,२१२अप्पासाहेब नलवडे ५,९५०जवाहर ३,१००कुंभी-कासारी ५,७०९शरद १,६२२गायकवाड ३,००६डी. वाय. पाटील ७,०१०दालमिया २,०७१गुरुदत्त १,३११इको केन १,०६४इंदिरा (अथणी) ८२९एकूण ४५,९५५...................हुतात्मा १,२३४राजारामबापू साखराळे२,०७९राजारामबापू, वाटेगाव१,५६४सोनहिरा २,३९०वसंतदादा २,३९०विश्वासराव नाईक ३,५२५क्रांती ७४६मोहनराव श्ािंदे १,००२सर्वोदय ७००निनाईदेवी (दालमिया)२,९४१सद्गुरू ८५७उदगिरी १६,४०७एकूण ३५,७९५...................................शेतकरी मात्र अनभिज्ञविभागातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकºयांनी संमतीपत्रे दिल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाच्या अहवालावरून दिसून येते. मात्र ज्यांनी संमतीपत्रे दिली, त्या शेतकºयांना याबाबत काहीच माहीत नाही. मग कारखान्यांनी नेमकी संमती कोणाकडून व कशी घेतली? हा प्रश्न आहे.आपल्या कष्टाचे पैसे दोन-तीन टप्प्यांत द्या, असे एकही शेतकरी म्हणणार नाही. ही कारखानदारांची मखलाशी असून, या संमतीच्या पत्राच्या आडून कायद्यातून सुटण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर गाठ ‘स्वाभिमानी’शी आहे.- प्रा. जालंदर पाटील, राज्याध्यक्ष, ‘स्वाभिमानी’ संघटना