शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: कोल्हापूर जिल्ह्यात विविध मार्गावरील ८०० फेऱ्या रद्द, संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार ?

By सचिन यादव | Updated: September 4, 2024 18:17 IST

दोन दिवसांत सुमारे 'इतक्या' लाखांचे नुकसान

कोल्हापूर : एसटी कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा फटका दुसर्या दिवशीही बसला. मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा, संभाजीनगर सह जिल्ह्यातील बारा आगारातून तुरळक वाहतूक सुरु राहिली. दोन दिवसांत सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. विविध मार्गावरील ८०० फेर्या रद्द करण्यात आल्या. ५० हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास थांबला. संपामुळे मुंबई आणि पुणे मार्गावरील बसेस उपलब्ध होत्या, मात्र प्रवासी नसल्याचे चित्र मध्यवर्ती बसस्थानकात होते. जिल्ह्यातील अन्य मार्गावरील वाहतूक सुरु राहिली.विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. त्याचा फटका बारा आगारातील प्रवाशांना बसला. त्यासह एसटी प्रशासनाला आर्थिक फटका बसला. मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, रंकाळा बसस्थानकासह बारा आगारातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. मंगळवारी पहाटेपासून सीबीएसमध्ये तुरळक वाहतूक सुरु राहिली. पुणे, मुंबई, पाटण, कराड, चिपळूण, महाड, जोतिबा, कोडोली, वाई, फलटण या मार्गावर एसटी बसेस फलाटवर थांबून होत्या. मात्र त्या मार्गावर प्रवासी नसल्याचे चित्र होते.जिल्ह्यातील अन्य आगारात मात्र तुरळक वाहतूक सुरु राहिली. दररोज जिल्ह्यातील १२ आगारातून ८५२ एसटी बसेस धावतात. दुपारपर्यंत केवळ ३५० एसटी धावली. परराज्यातूून आलेल्या काही एसटीतून प्रवासी वाहतूक सुरू राहिली. मात्र ही तुरळक प्रमाणात होती.

संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई ?एसटीमध्ये झालेल्या कायद्यानुसार एसटी कर्मचारी संपात सहभागी झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करता येते. संपात सहभागी झालेल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. ही यादी आल्यानंतर संबधितांवर कारवाईची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणात अहवाल आल्यानंतर कारवाईची प्रक्रिया होईल, असे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संप