कोल्हापूर : महाडिक परिवाराने भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथील पूरग्रस्तांना ८०० सिमेंट पोत्यांचे वितरण केले आहे. मोटर रेसर कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये ही मदत वितरित करण्यात आली. जिल्ह्यावर कोणत्याही प्रकारची आपत्ती ओढवली की, संकटग्रस्तांच्या मदतीला सर्वप्रथम महाडिक कुटुंबीय धावून जातात. हीच परंपरा कायम राखत, कृष्णराज महाडिक यांनी शेणगावमधील पूरग्रस्तांना घरबांधणीसाठी ८०० पोती सिमेंट दिले आहे. शेणगाववासीय ही मदत कधीच विसरणार नाहीत, असे उद्गार देवराज बारदेस्कर यांनी यावेळी काढले.
शेणगाव येथे महापुराचा फटका अनेक कुटुंबांना बसला आहे. काही घरांची पडझड झाली, तर काही घरांचे मोठे नुकसान झाले. शेणगावसह भुदरगड तालुक्यातील १३ गावांतील पूरग्रस्तांना ही सिमेंट पोती देण्यात आली असून, लवकरच या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्यही देणार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रेरणेतून हे कार्य हाेत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मानसिंग तोरसे, राजेंद्र शिंदे, सुनील कोरे, शुभम वायचळ, ओंकार विभूते यांच्यासह धनंजय महाडिक युवाशक्तीचे विजयबाबा महाडिक, नंदकुमार शिंदे, शक्तिजीत पोवार, पार्थ सावंत, तुकाराम देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
२१०८२०२१ कोल कृष्णराज महाडिक
भुदरगड तालुक्यातील शेणगावसह १३ गावांना महाडिक परिवाराच्यावतीने ८०० सिमेंट पोत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी मोटर रेसर कृष्णराज महाडिक, देवराज बारदेसकर यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.