शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ८० टक्के रोजगार भूमिपुत्रांना : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:39 IST

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा, उद्योगक्षेत्रात ८० टक्के रोजगार भूमिपुत्रांना : सुभाष देसाई कौशल्य विकासासाठी जिल्हा नियोजनमधून एक कोटीची तरतूद : पालकमंत्री

कोल्हापूर : मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यासाठी उद्योगांना बळ देण्याचे काम सुरू असून या क्षेत्रात ८० टक्के रोजगार स्थानिक भूमिपुत्रांना देणे ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे केले; तर याच कार्यक्रमात कौशल्य विकासासाठी जिल्हा नियोजनमधून एक कोटींची तरतूद केल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.उद्योग विभागातर्फे पेटाळा येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या आवारात आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. प्रमुख उपस्थिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, उद्योग सहसंचालक व्ही. एल. राजाळे, आदींची होती.उद्योगमंत्री देसाई म्हणाले, उद्योगक्षेत्रात गेल्या साडेचार वर्षांत आमूलाग्र सुधारणा आणि बदल करण्यात आले आहेत. उद्योजकांना यापूर्वी घ्याव्या लागणाऱ्या सुमारे ७५ परवानग्यांची संख्या कमी करून ती आता केवळ १० ते १५ वर आणली आहे. त्याबरोबरच उद्योगघटकांना पायाभूत सुविधा आणि सवलती देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला असून, आतापर्यंत पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणी झालेल्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूर येथील मेळाव्यातूनही अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.पालकमंत्री पाटील म्हणाले, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व जिल्ह्यांत कौशल्य प्रशिक्षणास प्राधान्य दिले आहे. कौशल्य विकासाला अधिक व्यापकता देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीतून यासाठी एक कोटीची तरतूद करण्याचा मानस आहे. तसेच नवउद्योजकांना भाग भांडवलासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद करण्यावर शासनाने भर दिला आहे.आमदार क्षीरसागर म्हणाले, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. 

 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईkolhapurकोल्हापूर