सलग ४०व्या रविवारी स्वच्छता मोहीम : ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:07 AM2020-02-03T10:07:01+5:302020-02-03T10:08:34+5:30

यावेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर आॅर्गनायझेशन संस्थेकडून ‘मेंटेनन्स डे’निमित्त झाडांच्या देखभालीसंदर्भात अतिशय नेटके नियोजन केले. त्यांनी एकाच वेळी तीन पथकांद्वारे रुईकर कॉलनी, मुक्त सैनिक वसाहत, वाहतूक पोलीस कार्यालय बावडा, सुभाष रोड, शाहूपुरी, बागल चौक, दसरा, राजारामपुरी चौक, प्रतिभानगर व माळी कॉलनी, टाकाळा या प्रभागांतील लावण्यात आलेल्या १५० झाडांना पाणी घालून, औषध फवारणी केली.

7th consecutive cleanup campaign on Sunday | सलग ४०व्या रविवारी स्वच्छता मोहीम : ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने रविवारी शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी कोटीतीर्थ तलाव परिसराची स्वच्छ करण्यात आला.कोल्हापुरातील रिलायन्स मॉलच्या पिछाडीचा परिसर सामाजिक संघटनांसह महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केला.

googlenewsNext

कोल्हापूर : शहरामध्ये सलग ४०व्या रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात सात टन कचरा, प्लास्टिक उठाव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.

यावेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर आॅर्गनायझेशन संस्थेकडून ‘मेंटेनन्स डे’निमित्त झाडांच्या देखभालीसंदर्भात अतिशय नेटके नियोजन केले. त्यांनी एकाच वेळी तीन पथकांद्वारे रुईकर कॉलनी, मुक्त सैनिक वसाहत, वाहतूक पोलीस कार्यालय बावडा, सुभाष रोड, शाहूपुरी, बागल चौक, दसरा, राजारामपुरी चौक, प्रतिभानगर व माळी कॉलनी, टाकाळा या प्रभागांतील लावण्यात आलेल्या १५० झाडांना पाणी घालून, औषध फवारणी केली. यावेळी आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, स्वच्छतादूत अमित देशपांडे, स्वरा फौंडेशनचे कार्यकर्ते, महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

स्वच्छता केलेला परिसर
तपोवन ग्राउंड कळंबा फिल्टर हाऊस ते कळंबा जेल, हॉकी स्टेडियम ते इंदिरासागर हॉल, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, सायबर चौक ते शेंडा पार्क, टेंबलाईवाडी उड्डाण ते कावळा नाका, डी.एस.पी. आॅफिस ते भगवा चौक मेन रोड तसेच रियालन्स मॉलच्या पिछाडीस, पंचगंगा नदीघाट, कोटीतीर्थ तलाव.

  • महापालिकेची यंत्रणा

४ जेसीबी, ७ डंपर, ६ आरसी गाड्या व महापालिकेचे ११० स्वच्छता कर्मचारी.
 

 

Web Title: 7th consecutive cleanup campaign on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.