शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील ७७ जणांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:23 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चार विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बुधवारी समुपदेशनातून बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सामान्य प्रशासन, प्राथमिक शिक्षण, ग्रामपंचायत आणि कृषी विभागातील एकूण ७७ बदल्या करण्यात आल्या. आज, गुरुवारीही उर्वरित विभागांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. ​​​​​​​

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेतील ७७ जणांच्या बदल्यामाध्यमिकच्या बदल्यांवरून मतभेद

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या चार विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बुधवारी समुपदेशनातून बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सामान्य प्रशासन, प्राथमिक शिक्षण, ग्रामपंचायत आणि कृषी विभागातील एकूण ७७ बदल्या करण्यात आल्या. आज, गुरुवारीही उर्वरित विभागांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, राजेंद्र भालेराव, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी, अधीक्षक, विस्तार अधिकारी, वरिष्ठ, कनिष्ठ सहायक अशा ५२ जणांच्या बदल्या करण्यात आल्या.शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख अशा दोघांच्या आणि ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी अशा १७ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. कृषी विभागाच्या सहा बदल्या करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेने जाहीर केलेला बदली कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी समिती सभागृहामध्ये ही प्रक्रिया पार पाडली. माध्यमिकच्या बदल्यांवरून मतभेददरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागातील बदल्यांवरून अमन मित्तल आणि रविकांत आडसूळ यांच्यामध्ये मतभेद झाल्याचे समजते. बदलीची कारवाई करायची असेल तर अशा कर्मचाऱ्यांना या समुपदेशन प्रक्रियेमध्ये घेता येणार नाही. त्यांची चौकशी करून अहवाल आल्यानंतर त्यांची बदली करावी लागेल, अशी भूमिका आडसूळ यांनी मांडली; तर ‘आत्ताच्या आत्ता बदल्या करा. तसे स्थायीमध्ये ठरले आहे,’ असे सांगत मित्तल यांनी चौघांच्या बदल्या केल्या. अपंग कर्मचाऱ्यांना सूट असतानाही प्रक्रियेसाठी बोलावून घेतल्याने अनेकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर