शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांनी भरला ७५० कोटींचा जीएसटी, सर्वाधिक कर कोणत्या क्षेत्रातून..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 14:07 IST

दोन व्यावसायिकांवर कारवाई

कोल्हापूर : एकीकडे वेळेवर कर भरा म्हणून वस्तू व सेवा कर विभागाला वारंवार जनजागृती करावी लागत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने मात्र सर्वाधिक कर भरून आघाडी घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने एकूण करापैकी १५ टक्के इतका कर भरून सर्वाधिक योगदान दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मशिनरी आणि मेकॅनिकल इंडस्ट्रीही मोठ्या प्रमाणात आहे. या इंडस्ट्रीने १४ टक्के इतका कर भरला आहे. तर लोखंड, पोलाद व वस्तू क्षेत्रातून जवळपास १२ टक्के इतका कर भरण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते जुलै २०२३ या चार महिन्यात तब्बल ७५०.८३ कोटी रुपयांचा भरणा जीएसटीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. गतवर्षी या चार महिन्यात ६९६.६७ कोटी रुपयांचे संकलन झाले होते.

कर भरण्यात जुलैमध्ये ४.९७ टक्के वाढकोल्हापूर जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षाच्या जुलै महिन्यात १५५.४ कोटी इतके जीएसटीचे संकलन झाले आहे. गतवर्षी जुलै २०२२ मध्ये जीएसटीचे संकलन १४७.६९ कोटी इतके होते. यावर्षी मात्र, जुलै महिन्यात जीएसटी संकलनात ४.९७ टक्के वाढ झाली आहे.

दोन व्यावसायिकांवर कारवाईवस्तू व सेवांचा पुरवठा किंवा खरेदी न करता बनावट बीजके देऊन शासनाची कर फसवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील दोन व्यावसायिकांना २०२२-२३ या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभागाच्या तक्रारीनंतर अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे कोल्हापूर विभागाच्या राज्यकर सहआयुक्त सुनीता थोरात यांनी सांगितले.

खोटी कागदपत्रे सादर करून, किंवा कागदपत्रांचा गैरवापर करुन बनावट नोंदणी दाखल घेणाऱ्या व्यावसायिकांविरोधात नाेंदणी दाखला रद्द करणे, इनपुट टॅक्स क्रेडिट रोखणे, शास्ती लावणे अशा स्वरुपाची कारवाई केली आहे. - सुनीता थोरात, राज्यकर सहआयुक्त, वस्तू व सेवा कर कोल्हापूर विभाग.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGSTजीएसटी