शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या संपामुळे ७५० कोटींचा व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 18:20 IST

Banking Sector Kolhapur-मोदी सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकातील कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर आहेत. जिल्ह्यातील १७० बँकांच्या १५० पेक्षा जास्त शाखांमधील पाच हजार कर्मचारी यामध्ये सहभागी झाल्याने बँका बंद राहिल्या. क्लिअरिंग, कॅश बंद राहिल्यामुळे दिवसभरात सुमारे ७५० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. दरम्यान, सकाळी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या दारात बँक कर्मचाऱ्यांनी मूक निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध केला.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील पाच हजार कर्मचारी सहभागीसलग चार दिवस बँका बंद, एटीएमही झाले रिकामे

कोल्हापूर : मोदी सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकातील कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर आहेत. जिल्ह्यातील १७० बँकांच्या १५० पेक्षा जास्त शाखांमधील पाच हजार कर्मचारी यामध्ये सहभागी झाल्याने बँका बंद राहिल्या. क्लिअरिंग, कॅश बंद राहिल्यामुळे दिवसभरात सुमारे ७५० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. दरम्यान, सकाळी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या दारात बँक कर्मचाऱ्यांनी मूक निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध केला.देशातील १२ सार्वजनिक क्षेत्रातील, १२ जुन्या जमान्यातील खासगी, ६ विदेशी, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकांतील कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निदर्शने, धरणे, मेळावे इत्यादी कार्यक्रमांना जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्याने राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचाऱ्यांनी शाखेच्या दारात मूक निदर्शने केली.

लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर सर्व कर्मचारी एकत्र येऊन निदर्शने केली. राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाचे तोटे सांगणाऱ्या माहिती पत्रकाचे वाटप परिसरात केले. यावेळी विकास देसाई, रमेश कांबळे, सुहास शिंदे, प्रमोद शिंदे, चंद्रकांत गुडस्कर, विवेककुमार आदी उपस्थित होते.

बँकांचा संप १०० टक्के यशस्वी झाला. राज्यात १० हजार शाखांचे शटरही उघडले नाही. कॅश, क्लिअरिंग ठप्प होते. कोरोनामुळे मेळावे, धरणे, मोर्चा, आंदोलन करता आले नसले तरी प्रत्येक शाखेतील ५ कर्मचाऱ्यांच्या गटाने परिसरातील भाजी मंडई, बाजारपेठेत जाऊन बँक खासगीकरणाचे तोटे काय आहेत, याच्या माहितीपत्रकाचे वाटप केले. मंगळवारीही अशाच प्रकारे आंदोलन राहील. पुढील आठवड्यात युनायटेड फोरमची मीटिंग होणार असून, पुढील आंदोलन तीव्र करण्याबाबत रणनीती ठरविली जाईल.देवीदास तुळजापूरकर,निमंत्रक युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर