शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ हजार ३०७ जागांसाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 10:40 IST

gram panchayat Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हयात  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत ४७ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुक झाली असून सायंकाळपर्यंत प्रतिस्पर्धांनी माघार घ्यावी यासाठी उमेदवारांकडून जोरकस प्रयत्न सुरु होते. सोमवारी सायंकाळपर्यंत ७ हजार ४० उमेदवारांनी माघार घेतली. तसेच चिन्हांचे वाटप करण्यात आले. आता निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाल्याने मंगळवारपासून गावागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ हजार ३०७ जागांसाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात१५ जानेवारीला मतदान : ७ हजार ४० जणांची माघार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयात  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत ४७ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुक झाली असून सायंकाळपर्यंत प्रतिस्पर्धांनी माघार घ्यावी यासाठी उमेदवारांकडून जोरकस प्रयत्न सुरु होते. सोमवारी सायंकाळपर्यंत ७ हजार ४० उमेदवारांनी माघार घेतली. तसेच चिन्हांचे वाटप करण्यात आले. आता निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाल्याने मंगळवारपासून गावागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.कोल्हापुर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींची निवडणुक प्रक्रिया सध्या सुरु पुढील दहा दिवस आता गावागावात प्रचाराचा धुरळा उडणार असून १५ जानेवारीला मतदान आहे. १८ तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरु झाली आहे. ३० तारखेपर्यंत अर्ज स्विकारण्याची मुदत होती. या कालावधीत १५ हजार ८३० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

३१ डिसेंबरला झालेल्या छाननीत १८३ अर्ज अवैध ठरले तर काही जणांनी दुबार अर्ज भरले होते. उमेदवारीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १५ हजार ४१७ इतकी होती. त्यापैकी जवळपास ५० टक्के उमेदवारांनी माघार घेतली आहे.आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून गावागावात स्थानिक राजकारण, गटातटाचे राजकारण सुरु झाले आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडीने एकत्र निवडणुक लढवत आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांमध्येच निवडणूक होत आहे.निवडणुक होवू घातलेल्या ग्रामपंचायती : ४३३ , पैकी ४७ बिनविरोध .

  • निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती : ३८६
  • एकूण प्रभाग संख्या : १ हजार ४९१
  • बिनविरोध प्रभाग १४६
  • एकूण सदस्य संख्या : ४ हजार २७
  • बिनविरोध सदस्य संख्या ७२०
  • रिंगणातील उमेदवारांची संख्या : ७ हजार ६५७ 

सर्वाधीक उमेदवार असलेल्या टॉपच्या तीन ग्रामपंचायती

  • कागल : १ हजार ४९
  • करवीर : १ हजार १७०
  • शिरोळ : ९९४

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर