शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Kolhapur- धक्कादायक!, खेळात हरला म्हणून सहावीतील मुलाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 12:20 IST

इतर मुलांनी चिडविल्याने नाराज झाला

हुपरी (जि.कोल्हापूर) : मुलांसोबत खेळत असताना झालेला पराभव सहन न झाल्याने रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मीनगर वसाहतीतील १२ वर्षांच्या मुलाने छपराच्या लोखंडी अँगलला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. यश ऊर्फ गुंड्या नामदेव राठोड (वय १२) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. त्याने नुकतीच इयत्ता सहावीची परीक्षा दिली आहे. त्याचे आईवडील दगडखाणीवर दगड फोडणे, वाहतूक करणे व चहाटपरी चालविण्याचे काम करतात.रेंदाळ येथील लक्ष्मीनगर वसाहतीनजीकच्या माळरानावर क्रशर आहेत. या क्रशरसाठी खाणीत दगड फोडणे व त्याची वाहतूक करण्याचे काम कर्नाटकातील लमाण समाजातील कुटुंबे करीत असतात. ही कुटुंबे या क्रशर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्येच वास्तव्यास असतात. सध्या परीक्षा संपल्या असल्याने शाळा या सकाळीच भरतात. त्यानंतर दुपारच्या वेळेत सर्व मुले विविध प्रकारचे खेळ व स्पर्धा खेळत असतात. शांतीकुमार पाटील यांच्या क्रशरवरील मुले नेहमीप्रमाणे काचाकवड्याचा खेळ खेळत होते. या खेळात यश हा हरला होता. त्याला इतर मुलांनी चिडविल्याने नाराज झाला होता. त्याचे वडील ट्रॅक्टर घेऊन पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामासाठी गेले होते. आई व थोरला भाऊ जवाहर साखर कारखान्यावरील चहाटपरीवर गेले होते. त्यामुळे घरी कोणीही नसल्याचे पाहून यशने आपल्या छपराच्या लोखंडी अँगलला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर