शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अद्याप ६२ टक्के पूरबाधित ऊस शेतातच, कारखान्यांकडून थंडा प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:28 IST

अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे.

नसीम सनदी कोल्हापूर : आधीच निसर्गाने मारले असल्याने सहानुभूती ठेवून साखर कारखान्यांनी पूरबाधित ऊस हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच तोडून न्यावा असे सक्त आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन देखील त्याचा विसर पडल्यासारखीच जिल्ह्यातील परिस्थिती आहे. पुराचा सामना करावा लागणाऱ्या १९ कारखान्यांनी हंगाम सुरू झाल्याच्या या दोन महिन्यात १८ हजार ८७४ पैकी ७२२१ हेक्टवरीलच ऊस तोडला आहे. अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे.ऊस ऐन वाढीच्या अवस्थेत असताना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या महापुराने नदी-ओढ्याकाठच्या पिकाचे अतोनात नुकसान केले. निसर्गाच्या या अवकृपेमुळे ऊस उत्पादक सलग तिसऱ्या वर्षी मोडून वाढला. त्याला आधार देण्यासाठी म्हणून स्वत: जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पुढाकार घेत पूरबाधित प्राधान्याने तोडावा असा आग्रह धरला. यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण समिती देखील नेमली. रोजच्या रोज आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.यासंदर्भात स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी तीनवेळा कारखाना प्रतिनिधींशी बैठक घेऊन त्यांना ६०: ४०या प्रमाणात तोडीचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नोव्हेबर अखेरपर्यंत पूरबाधित ऊस तुटला पाहिजे असे सक्त आदेशही काढले, पण आता नोव्हेंबर संपण्यास आठ दिवसांचा कालावधी उरला असताना वस्तूस्थिती तपासली असता १९ कारखान्यांनी केवळ ३८ टक्केच ऊस तोडला असल्याचे निदर्शनास आले आहे.खासदार मागे, मंत्री पुढे- पूर बाधित ऊस तोडण्यामध्ये खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील मंडलिक कारखान्याने केवळ १४ टक्केच ऊस तोडला आहे. 

- याउलट पालकमंत्री सतेज पाटील यांच्या डी.वाय कारखान्याने ५२ टक्के, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती कारखान्याने ६५ टक्के तर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद कारखान्याने ५९ टक्के ऊस गाळप केला आहे.

उसाचे मग सरपणच..!- नदीकाठचा ऊस गाळाने माखला आहे. त्याला आता किरळे फुटू लागली आहेत. गुंठ्याला १० मोळी देखील चांगला ऊस निघणार नाही 

- आता तर उन्हाचा तडाखा जसा वाढेल तसे या उसाचे सरपणच होणार आहे. काडी लावून पेटवून देण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहणार नाही. 

- आता हे क्षेत्र तुटले तर रान रिकामे करुन रब्बी पीक घेता येणे शक्य आहे.

टक्केवारीराजाराम, कुंभी, गुरुदत्त, दत्त शिराेळ, शरद, दालमिया, दौलत, डी.वाय, जवाहर, बिद्री या कारखान्यांकडे एक हजार हेक्टरवरील पूरबाधित उसाची नाेद आहे. पण दालमियाचा ५८ टक्के, डी.वाय ५२, बिद्री ४८ टक्केचा अपवाद वगळता उर्वरित कारखान्यांची टक्केवारी ४० टक्क्यांच्या आतच आहे.

कारखानानिहाय पूर बाधित ऊस (हेक्टरमध्ये )

कारखाना पूर बाधित नोंद तुटलेले क्षेत्र टक्केवारी शिल्लक ऊस
वारणा ५८४ १९५३३३८९
पंचगंगा ७९४१२२१५६७१
कुंभी१६३८४६१२८११७७
बिद्री १००८ ४८५४८५२३
भोगावती ८१९१५९ १९६६०
दत्त २३२१८४४३६ १४७६
शाहू ८१६१७८ २१६३८
जवाहर१२४८३९७ ३१८५१
राजाराम१७७१ ५१०२८१२६१
आजरा ५५४४ ८०११
मंडलिक४६३६५ १४ ३९७
शरद१४४८ ८६३५९ ५८५
डी.वाय १०५९ ५५२ ५२ ५०६
अथणी६१ ४५७२   १६
दालमिया १२११७०७ ५८ ५०३
गुरुदत्त१५२२३९३ २५  ११२८
इको केन ६९५० ७२ १९
ओलम४४७ ४१९९३२७
सेनापती ३६५२४० ६५१२५

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने