शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बाजार समितीसाठी ६०९ जणांची माघार, १८ जागांसाठी ५१ रिंगणात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 12:18 IST

अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार गटात बहुरंगी तर इतर गटात सरळ लढत

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गुरुवारी अखेरच्या दिवशी माघारीसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. एकूण ६६० पात्र अर्जांपैकी तब्बल ६०९ जणांनी माघार घेतली असून १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार गटात बहुरंगी तर इतर गटात सरळ लढत होत आहे.सत्तारूढ आघाडीने बुधवारीच पॅनेलची घोषणा केल्याने त्यांच्याकडील इच्छुकांच्या गुरुवारी सकाळपासूनच निवडणूक कार्यालयाबाहेर माघारीसाठी रांगा लावल्या होत्या. विरोधी पॅनेलचा घोळ दुपारी दोनपर्यंत राहिल्याने अनेक जण थांबून होते. त्यांनी उमेदवार निश्चित केल्यानंतर माघारीसाठी पुन्हा गर्दी उसळली. तब्बल ६०९ जणांनी माघार घेतली.असे राहिलेत उमेदवारी अर्ज, कंसात जागा :विकास संस्था : सर्वसाधारण : १७ (७), महिला : ४ (२), इतर मागासवर्गीय : ३ (१), भटक्या विमुक्त जाती : २ (१)ग्रामपंचायत : सर्वसाधारण : २ (५), अनुसूचित जाती : ३ (१), आर्थिक दुर्बल : २ (१).अडते-व्यापारी : ८ (२)हमाल तोलाईदार : ७ (१)सत्तारूढ आघाडीचे उर्वरित उमेदवार जाहीरअडते-व्यापारी : वैभव सावर्डेकर व कुमार आहुजा (दोघेही कोल्हापूर)हमाल-तोलाईदार : दिलीप पोवार (कणेरी पैकी पोवारवाडी, पन्हाळा)सत्तारूढला ‘कपबशी’, विरोधकांना ‘शिलाई मशीन’?

आज, शुक्रवारी चिन्हांचे वाटप केले जाणार असून सत्तारूढ आघाडीने ‘कपबशी’ तर विरोधकांनी शिलाई मशीन चिन्हाची मागणी केली आहे.

विरोधी ‘शिव-शाहू परिवर्तन’ आघाडीची मोट कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील-सरुडकर, चंद्रदीप नरके, संजय पवार, समरजीत घाटगे, राहुल देसाई, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदींच्या नेतृत्वाखालील विरोधी ‘शिव-शाहू शेतकरी परिवर्तन’ आघाडीची मोट बांधली आहे.आघाडीने सर्वच्या सर्व १८ उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व प्रमुखांना घेत बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य पक्षाच्या नेत्यांनी केला होता. मात्र त्याला खीळ बसली आहे. विरोधी पॅनलमध्ये दोन माजी संचालकांना संधी देण्यात आली आहे.

उमेदवार असे :विकास संस्था : सर्वसाधारण - रणजित पाटील (चुये), बाजीराव पाटील (वडणगे), किरण पाटील(महे), सुरेश पोवार (सातार्डे), अर्जुन चौगुले (पोर्ले), प्रताप मेंगाणे (बामणे, भुदरगड), बळवंत पाटील (चंद्रे)महिला : कविता शाहू चव्हाण (दऱ्याचे वडगाव) व अरुणा अशोक पाटील (पाडळी बुद्रूक).इतर मागासवर्गीय : अनिल वायकुळ (आंबा)भटक्या विमुक्त जाती : मधुकर पाटील (मोरेवाडी, भुदरगड)ग्रामपंचायत गट :सर्वसाधारण : संजय जाधव (हणमंतवाडी) व सुरेश पाटील (पिरळे, शाहूवाडी)आर्थिक दुर्बल : समाधान म्हातुगडे (सोनाळी, कागल).अनुसूचित जाती : उत्तम कांबळे (गोरंबे)अडते - व्यापारी गट : नंदकुमार वळंजू व अमर क्षीरसागर (कोल्हापूर)हमाल-तोलाईदार : राजाराम जगताप (कुराडवाडी, पन्हाळा)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजारElectionनिवडणूक