शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

गडहिंग्लज पालिकेकडून ६ कोटींची करवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 11:53 IST

Muncipal Corporation Gadhinglaj kolhapur- कोरोनाच्या संकटातही गडहिंग्लज शहरातील सुज्ञ नागरिकांनी नगरपालिकेच्या करवसुलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे गेल्यावर्षीच्या थकित करासह चालूवर्षीची मिळून सरासरी ९० टक्यांवर करवसुली झाली. शासकीय कर वजा जाता एकूण ६ कोटी १५ लाख ५१ हजार ७८० इतकी निव्वळ करवसुली झाली, अशी माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली.

ठळक मुद्देगडहिंग्लज पालिकेकडून ६ कोटींची करवसुली सरासरी ९० टक्के वसुली : कोरोनातही नागरिकांचे सहकार्य

गडहिंग्लज :कोरोनाच्या संकटातही गडहिंग्लज शहरातील सुज्ञ नागरिकांनी नगरपालिकेच्या करवसुलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे गेल्यावर्षीच्या थकित करासह चालूवर्षीची मिळून सरासरी ९० टक्यांवर करवसुली झाली. शासकीय कर वजा जाता एकूण ६ कोटी १५ लाख ५१ हजार ७८० इतकी निव्वळ करवसुली झाली, अशी माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली.मुतकेकर म्हणाले, घरपट्टी, शिक्षणकर, रोजगार हमी कर, विशेष स्वच्छता कर, वृक्षकर, अग्निशमन कर, घनकचरा संकलन शुल्क मिळून गेल्यावर्षीचा थकित ९७ लाख ५७ हजार ५३१ व चालूवर्षीचे ४ कोटी ९ लाख ५४ हजार ३९८ एकूण ५ कोटी ७ लाख ११ हजार ९२९ इतके वसुलीचे उद्दिष्ट होते.निव्वळ वसुली योग्य ४ कोटी ९१ लाख २३ हजार ७७३ पैकी ४ कोटी ५७ लाख ८७ हजार ४१४ म्हणजे ९३.४२ टक्के इतकी वसुली झाली.वाढीव हद्दीतील गतवर्षीचे थकित ३ लाख २४ हजार ३९५ आणि चालू वर्षीचे ४० लाख ३१ हजार ९५९ मिळून ४३ लाख ५६ हजार ३५४ इतके कर वसुलीचे उद्दिष्ट होते.निव्वळ वसुली योग्य मागणीच्या ४३ लाख ४५ हजार ३११ पैकी ३८ लाख ७९ हजार ४३ रूपये म्हणजेच ८९.०४ टक्के इतकी करवसुली झाली.याकामी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह सर्व नगरसेवक, लेखापाल शशीकांत मोहिते, करअधिक्षक भारती पाटील, कर सहाय्यक अवंती पाटील, निजानंद मिश्रकोटी, नरेंद्र कांबळे, संतोष घार्वे, भैरू कमते आदींसह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले, असेही मुतकेकर यांनी सांगितले. ९२ टक्के पाणीपट्टी वसूलगेल्यावर्षीची थकित पाणीपट्टी ३४ लाख ४२ हजार १० रूपये व चालूवर्षीची ९५ लाख ७७ हजार १२० रूपये मिळून १ कोटी २९ लाख १९ हजार १३० इतकी पाणीपट्टी वसुली होती. त्यातील निव्वळ वसुली योग्य मागणीपैकी १ कोटी १८ लाख ८५ हजार ३२३ म्हणजेच ९१.९९ इतकी पाणीपट्टी वसुल झाली, असेही मुतकेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर