शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

तुटलेल्या विद्युत तारांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात दीड वर्षांत ५८ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 16:39 IST

देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर : गावात, शेत-शिवारात तुटलेल्या विद्युत तारांना स्पर्श होऊन आणि खांबांमध्ये वीज उतरून झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या दीड वर्षांत ५८ जणांनी प्राण गमावला. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुटलेल्या विद्युत तारा मृत्यूचे सापळे ठरत आहेत. वाढत्या अपघातांमुळे महावितरणच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.वादळी वारा आणि पावसामुळे झाडांच्या फांद्या पडून विजेच्या तारा तुटतात. जमीन खचल्याने विजेचे खांब कलतात. जीर्ण झालेल्या तारा तुटून शेतात पडल्याने दुर्घटना घडतात. जानेवारी २०२३ ते ८ जुलै २०२४ या कालावधीत जिल्ह्यात विजेच्या तारांचा स्पर्श होऊन ५८ जणांनी जीव गमावला. गेल्या आठ दिवसांत तीन घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे दोघे सख्खे भाऊ ठार झाले. नागाव (ता. हातकणंगले) येथे शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर वडणगे (ता. करवीर) येथे शेतात बांधावरील गवताला खत टाकण्यासाठी गेलेला तरुण विजेच्या धक्क्याने ठार झाला.या तिन्ही घटनांमध्ये शेतात पडलेल्या विद्युत तारा शेतकऱ्यांना दिसल्याच नाहीत. उसाची शेती, वाढलेेले गवत, झाडी यामुळे पडलेल्या तारा लक्षात येत नाहीत. पावसामुळे साचलेले पाणी आणि ओलसर हिरव्या वनस्पतींमुळे हा धोका आणखी वाढतो. अशा दुर्घटना रोखण्यासाठी महावितरणला तातडीने ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तसेच नागरिकांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.दुरुस्ती होते की नाही?दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विद्युत खांब, तारा, डीपी यांची तपासणी केली जाते. जीर्ण खांब आणि तारा बदलल्या जातात. अडथळे ठरणाऱ्यांच्या झाडांची छाटणी केली जाते. विद्युत प्रवाहात बिघाड निर्माण होताच पुरवठा खंडित होण्यासाठी सर्किट ब्रेकर्स, रिलेज, फ्यूज यांचा वापर केला जातो. मात्र, त्यानंतरही दुर्घटनांची संख्या वाढत असल्याने दुरुस्तीच्या कामांबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

कुटुंबीयांना चार लाखांची मदतमहावितरणच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृताच्या नातेवाइकांना चार लाख, तर जखमीला दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेचा पंचनामा होणे गरजेचे असते.

खबरदारी घेणे गरजेचेशेतात विजेचे खांब असल्यास शेतकऱ्यांनी तारांचा अंदाज घ्यावा. वाकलेले खांब आणि लोंबकळणाऱ्या तारा दिसताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवावे. स्वत:हून तारा हटवण्याचा प्रयत्न करू नये. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. विद्युत पंप हाताळताना किंवा चालू करताना रबरी हातमोजे, गमबूट वापरावेत असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजmahavitaranमहावितरण