शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

कोल्हापूर जिल्ह्यातील ५७ बंधारे अद्याप पाण्याखालीच, पावसाची उघडझाप : पूरस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 18:27 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारीही उघडझाप राहून काही काळ शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊनही पडले. जिल्ह्यातील नद्या अजून तुडूंब भरल्या असल्याने अद्याप ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील ५७ बंधारे अद्याप पाण्याखालीच, पावसाची उघडझाप : पूरस्थिती कायम  पंचगंगेची पाणी पातळी ३७.०८ फुटांवर : शिवाजी पुलावरील अवजड वाहतूक बंदच

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारीही उघडझाप राहून काही काळ शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊनही पडले. जिल्ह्यातील नद्या अजून तुडूंब भरल्या असल्याने अद्याप ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.

राधानगरी धरणातील दोन दरवाजांतून ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधारा येथे दुपारपर्यंत ३७.०८ इतकी राहिली. शिवाजी पुलावरून कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदच आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर तीन दिवसांपासून कमी झाला आहे. सोमवारी पावसाची उघड-झाप होऊन अधून- मधून हलक्या सरी कोसळत होत्या. शहरासह जिल्ह्यातही काही काळ सूर्यदर्शन झाले. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरल्याने अद्यापही ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.

राज्यमार्ग ४, प्रमुख जिल्हा ७, ग्रामीण १६ व इतर जिल्हा १९ असे ४६ मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी इंचा-इंचाने कमी होत असली तरी अद्यापही ती राजाराम बंधारा येथे दुपारी ३७.०८ फुटांवर राहिली. पंचगंगा इशारा पातळीच्या खाली गेल्याने दोन दिवसांपासून शिवाजी पूल येथून बंद करण्यात कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला; परंतु अद्याप चारचाकी व अवजड वाहनांसाठी तो सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले असून त्यामधून ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सोमवारी सकाळी आठपर्यंत १४.६८ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक गगनबावड्यामध्ये ४५.५० मि.मी., त्याखालोखाल शाहूवाडीमध्ये ३१.०० मि.मी. पाऊस पडला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा -हातकणंगले (२.१२), शिरोळ (०.५७), पन्हाळा (१२.२९), शाहूवाडी (२६.३३), राधानगरी (२४.५०), गगनबावडा (३०.००), करवीर (७.६३), कागल (७.१४), गडहिंग्लज (६.००), भुदरगड (२३.८०), आजरा (१६.००), चंदगड (१९.८३).

दूधगंगा, कोयनेतून विसर्ग वाढविलादूधगंगा धरण ८८ टक्के भरले असून येथून ८००० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरण ८४ टक्के भरले असून येथून ६,०६१ क्युसेक, कोयना ७९ टक्के भरले असून ३२ हजार ८०९ क्युसेक, अलमट्टी ८७.८९ भरले असून १ लाख ६५ हजार ६५८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा व कोयना धरणांतून जलविसर्ग वाढविण्यात आला आहे. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर