शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

उंबऱ्याबाहेर नारी..बनली कारभारी; कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात ५६२ जणी बनल्या उद्योजिका 

By पोपट केशव पवार | Updated: March 8, 2025 15:53 IST

कर्तुत्वाला मिळाली झळाळी

पोपट पवारकोल्हापूर : महिला म्हणून तिच्याभोवती समाजाने निर्माण केलेली तटबंदी भेदली की तिची कर्तृत्वाची रेषा किती मोठी आहे याचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांनी दिला आहे. २०२४-२५ या एकाच वर्षात जिल्ह्यातील ५६२ महिलांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विविध योजनांचा लाभ घेऊन स्वत:चे उद्योग सुरू केले आहेत. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी स्वावलंबी रोजगाराची निवडलेली वाट इतर महिलांसाठी अन् जिल्ह्यासाठीही आदर्शवत ठरली आहे.युवक-युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळवून देऊन ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरू केली. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवतींना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून अर्थसाहाय्य देण्यात येते.सर्वसाधारण प्रवर्गातील नवउद्योजक महिलेला शहरी भागासाठी २५ टक्के अनुदान, तर ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदान मंजूर करण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील महिलांनी अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, इंजिनिअरिंग, पार्लर यांसह विविध उद्योग उभारून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन उद्योगाच्या कारभारी बनलेल्या या महिलांनी अन्नप्रक्रियेसंबंधित अधिक व्यवसाय उभारले आहेत.

मिळविले ३९ कोटींचे अनुदानजिल्ह्यातील ५६२ महिलांनी स्वत:चे ५ व १० टक्के भागभांडवल उभारून उद्योग उभारले आहेत. या उद्योगांना एका वर्षात ३८ कोटी ८४ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी २०२४-२५ या वर्षासाठी १२०० लाभार्थींचे उद्दिष्ट आहे. यापैकी आतापर्यंत १०३७ इतके उद्दिष्ट पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे यातील निम्म्याहून जास्त महिला आहेत.कोणत्या उद्योगाला पसंती

  • अन्नप्रक्रिया -२० टक्के
  • गारमेंट - २० टक्के
  • पार्लर-   ७ टक्के
  • इंजिनिअरिंग-५ टक्के

मुख्यमंत्री रोजगारनिर्मितीमुळे महिलांना बळउद्योग क्षेत्रात वाढ होत असताना त्यात महिला मागे राहू नये, तिचे अस्तित्व आणखी ठळक होण्यासाठी महिलांना व्यवसाय-उद्योगामध्ये सक्रिय पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजना सुरू करण्यात आली. यातून बँकेकडून कर्ज व अनुदान दिले जात असल्याने महिलांना सहजरीत्या उद्योग उभारणे शक्य झाले आहे. सुरुवातीला अर्ज केल्यानंतर जिल्हा कार्यबल समितीकडून मंजुरी दिली जाते. त्यानंतर अर्ज सरकारी बँक, खासगी बँक व सहकारी बँकेकडे पाठविला जातो. अर्ज मंजूर झाल्यानंतर उद्योजकाला कर्जाची रक्कम उपलब्ध होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिला