शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील ५५७ गावांत उद्या वनमित्र मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:09 IST

वनहक्क अधिनियमाची माहिती जिल्ह्यातील वनजमीन असलेल्या ५५७ गावांतील लोकांना व्हावी, यासाठी बुधवारी या गावांमध्ये वनमित्र मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील ५५७ गावांत उद्या वनमित्र मोहीमनिवासी उपजिल्हाधिकारी : वनहक्क अधिनियमाबाबत दावे दाखल करण्याचे आवाहन

कोल्हापूर : वनहक्क अधिनियमाची माहिती जिल्ह्यातील वनजमीन असलेल्या ५५७ गावांतील लोकांना व्हावी, यासाठी बुधवारी या गावांमध्ये वनमित्र मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, वनमित्र मोहिमेस संबंधित गावांतील ग्रामसेवक, तलाठी तसेच वनहक्क समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

यावेळी अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६, नियम २००८ सुधारित नियम २०१२ तील तरतुदीची माहिती संबंधितांना दिली जाईल. तसेच या कायद्यान्वये ज्यांना दावे दाखल करावयाचे असतील त्यांचे दावे स्वीकारले जातील.विजय देसाई म्हणाले, गगनबावडा, करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड या आठ तालुक्यांमधील ५५७ गावांत वनजमिनी आहेत. या गावांतील ५२५ वनहक्क समित्या गठीत झाल्या असून, आजअखेर ७४४ लाभार्थ्यांना वनहक्क जमिनी दिल्या आहेत. ६४० एकर जमिनींचे हक्क दिले असून, त्याच्या नोंदी सातबारावर घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील पाच उपविभागात गावपातळीवर दावे तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून, वैयक्तिक दाव्यांची संख्या चारशे ते पाचशेपर्यंत जाईल.जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे समन्वयक डी. के. शिंदे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक व भौगोलिक स्थितीचा विचार करून व गावातील वनजमिनीचे क्षेत्र व त्यामधील इतर पारंपरिक सन निवासींचे वाडे विचारात घेता संबंधित वाड्यांवरच्या इ.पा.व.नि.ना. वनकुरण, मत्स्य संगोपन व मच्छिमारी यासाठी सामूहिक दावे करता येतील, ते त्यांनी करावेत. यावेळी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या दीप्ती सिंग, स्मिता संकपाळ, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर