शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
2
भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!
3
मुलगी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
4
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
5
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास
6
"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
7
“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
8
पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
9
IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?
10
डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
11
“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा
12
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
13
ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली
14
Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
15
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
16
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
17
१५० भारतीयांची फसवणूक, प्रसिद्ध युट्यूबर बॉबी कटारियाला अटक, किती कोटींचा मालक?
18
"आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता...", रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक
19
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
20
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

पहिल्याच दिवशी २८ एस.टी.च्या ५५ फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 6:37 PM

कोल्हापूर जिल्हा बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी २८ बसेसद्वारे ५५ फेऱ्या झाल्या. सोशल डिस्टन्सचा नियम पाळून प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी २८ एस.टी.च्या ५५ फेऱ्यालालपरीला प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद

कोल्हापूर : जिल्हा बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी २८ बसेसद्वारे ५५ फेऱ्या झाल्या. सोशल डिस्टन्सचा नियम पाळून प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

विशेष म्हणजे गेल्चा चार महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील एस.टी.महामंडळाच्या सर्व बसेस प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. गुरुवारी त्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांसह चालक व वाहकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा गजबजून गेला.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने एस.टी.बसेसनाही जिल्हा बंदी करण्यात आली होती. चार महिन्यांनंतर आंतर जिल्हासह जिल्हांतर्गत प्रवासी वाहतुकीला राज्य शासनाने परवानगी दिली. त्यानुसार कोल्हापूर विभागातून सकाळी सहा वाजल्यापासून २८ बसेसद्वारे विविध मार्गांवर ५५ फेऱ्या मारण्यात आल्या. त्यास प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सकाळी सहा वाजता कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-इस्लामपूर, कोल्हापूर-सोलापूर अशा मार्गावर बसेस धावल्या. त्यात प्रत्येक बसमध्ये सोशल डिस्टन्स पाळून एकूण २२ प्रवाशांना प्रवास करता आला तर आजरा, चंदगड, गारगोटी, कागल, राधानगरी, या आगारांतूनही प्रत्येकी एक बस पुणे मार्गावर धावली. गगनबावडा, कागल या मार्गावरून सातारा आगारासाठी प्रत्येकी एक बस धावली.

इचलकरंजी आगारातून इचलकरंजी-सांगली, कुरुंदवाड-सांगली, इचलकरंजी-मिरज या मार्गावर धावल्या. गेले चार महिन्यांपासून मध्यवर्ती बसस्थानकाचा परिसर ओस पडला होता. गुरुवारी सकाळपासून बसेस सुरू होणार म्हटल्यावर आजूबाजूच्या दुकानदाराचेही चेहरे फुलले. विशेषत: एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. विशेषत: प्रवाशांना ई-पासचे बंधन घालण्यात आलेले नाही. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून कोल्हापुरात अडकून पडलेल्या नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळाला.

प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ज्या मार्गावर जादा मागणी आहे, त्या मार्गावर जादा बसेसची सोय केली जाईल. सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर करून प्रवासी वाहतूक केली जात आहे.-रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, एस. टी.महामंडळ, कोल्हापूर

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर