शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारमध्ये आकर्षक परताव्याच्या आमिषाने १४ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:58 IST

शेअर बाजारात गुंतवणूक करून आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने दोन लष्करी जवानांसह २0 जणांची सुमारे १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज शंकरराव मोहिते (रा. रामानंदनगर), असे त्या संशयिताचे नाव आहे.

ठळक मुद्देशेअर बाजारमध्ये आकर्षक परताव्याच्याआमिषाने १४ लाखांचा गंडाएकावर गुन्हा : दोन लष्करी जवानांसह २० जणांची फसवणूक

कोल्हापूर : शेअर बाजारात गुंतवणूक करून आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने दोन लष्करी जवानांसह २0 जणांची सुमारे १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज शंकरराव मोहिते (रा. रामानंदनगर), असे त्या संशयिताचे नाव आहे.शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने संशयित पृथ्वीराज मोहिते हा रकमा जमा करीत होता. एकाच अपार्टमेंटमध्ये राहत असल्याने फिर्यादी गायत्री ध्रूूव जाधव (रा. राजवीर हाईटस्, रामानंदनगर, कोल्हापूर) यांची संशयित मोहिते याच्याशी ओळख झाली. त्यातून त्यांनी मोहिते यांच्याकडे सुरुवातीला एक लाख ७० हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्याचा काही प्रमाणात परतावाही दिला. याच ओळखीतून जाधव यांच्या पतीचे सहकारी, नातेवाईक अशा २० जणांकडून त्याने एक ते दोन लाखांची रक्कम गुंतवणुकीच्या नावाने घेतली.एकदा पैसे दिल्यानंतर सात महिने त्याने गुंतवणुकीचा कोणताही परतावा दिला नाही. जाधव व त्यांच्या नातेवाइकांनी मोहिते याच्याकडे वारंवार रक्कम परत करण्याची मागणी केली. त्यावेळी मोहिते याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मोहिते याने गुंतवणूकदारांना धमकावण्याचा प्रकारही केल्याचे तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले.

एकूण १४ लाख, १० हजार रुपये घेऊन मोहितेने फसवणूक केल्याची फिर्याद करवीर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मोहिते याने आणखी किती जणांकडून अशा प्रकारे रक्कम घेतली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी