ओएलएक्सवर मोटारसायकलीच्या बहाण्याने ४० हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:05+5:302021-01-09T04:21:05+5:30

पेठवडगाव : ओएलएक्स ॲपवर मोटारसायकल विक्रीचे आमिष दाखवून एकाची ३९ हजार ७२९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला ...

40,000 fraud on OLX under the pretext of motorcycle | ओएलएक्सवर मोटारसायकलीच्या बहाण्याने ४० हजारांची फसवणूक

ओएलएक्सवर मोटारसायकलीच्या बहाण्याने ४० हजारांची फसवणूक

Next

पेठवडगाव : ओएलएक्स ॲपवर मोटारसायकल विक्रीचे आमिष दाखवून एकाची ३९ हजार ७२९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. फसवणूकप्रकरणी रिंकी पिंगल यांच्याविरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राकेश तानाजी घोगरे (रा. सहारा चाैक, पेठवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ४ जून २०२० ला घडला होता. आज हा गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, येथील राकेश घोगरे यांनी ओएलएक्स ॲपवरील मोटारसायकल विक्रीची जाहिरात पाहिली. यास प्रतिसाद देत या जाहिरातीवरील मोबाईल नंबरवर फोन करून मोटारसायकलबाबत चौकशी केली असता, संबंधिताने मोटारसायकल आर्मी पोस्ट ऑफिसमध्ये आहे, ती कुरिअरने पाठवून देतो, असे सांगून खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार पहिल्यांदा ३१५० रुपये पाठवले. त्यानंतर कुरिअर कंपनीचा नंबर दिला. त्यानंतर मोटारसायकल पार्सल करण्यासाठी तात्काळ १२९४० रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानंतर फोन केला असता, आर्मी पोस्ट ऑफिसने हे पार्सल थांबवले आहे, असे म्हणत आणखी १० हजार ६९९ भरा, अर्ध्या तासात मोटारसायकल मिळेल, असा बनाव केला. त्यामुळे अखेरीस सहा महिन्यांनी गुन्हा नोंद करण्यात आला. तपास प्रशिक्षणार्थी आरपीएस डॉ. धीरजकुमार करीत आहेत.

Web Title: 40,000 fraud on OLX under the pretext of motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.