शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ हजार पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 13:06 IST

gram panchayat Election Police Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अधिकारी, कर्मचारी असा ३ हजार ८०६ जणांचा कडक बंदोबस्त गावागावात नेमला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात १,१०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ हजार पोलीस तैनात कडक बंदोबस्त : संवेदनशील गावांत विशेष नजर

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अधिकारी, कर्मचारी असा ३ हजार ८०६ जणांचा कडक बंदोबस्त गावागावात नेमला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात १,१०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून भयमुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी गावे, मतदान केंद्रे, संवेदनशील गावे, मतदान केंद्रे आदींचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाईसाठी १५१ (३) व १४४नुसार ९३ प्रस्तावानुसार लोकांची यादी तयार केली आहे. त्यांच्यावर कडक नजर ठेवण्यात आली आहे. साडेचारशे लीटर दारुही जप्त केली आहे. दारुबंदी अंतर्गत ११६ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर ९४२ परवानाधारकांची शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी बुधवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.असा असेल फौजफाटा...

  • पोलीस अधीक्षक -०१
  • अतिरिक्त पोलीस अधीक्षक-०२
  • परिक्षेत्रीय पोलीस अधीक्षक - ०१
  • उपअधीक्षक - ०६
  • पोलीस निरीक्षक - २२
  • सहायक व पोलीस उपनिरीक्षक - ७८
  • पोलीस अंमलदार - २३०६(पुणे शहर पोलीस दलातील १५० व लोहमार्ग पोलीस मुंबईतील ५० अंमलदार)
  • गृहरक्षक दलाचे जवान - १४०७
  • एसआरपीएफची कंपनी - ०१

संवेदनशील गावात बंदोबस्तअतिसंवेदनशील गावासह ८८ गावांची यादी करण्यात आली आहे. या गावांमध्ये एक अधिकारी व दहा कर्मचारी असा विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या गावांमध्ये उपअधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांनी अचानक भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. पैसे वाटपासारखे अनुचित प्रकार रोखण्यासाठी तत्काळ गुन्हे दाखल करण्याचेही आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर