शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

चार शाळकरी मुलींवर अत्याचार; शिक्षकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:39 AM

xलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हॉकी संघामध्ये सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून नववीमध्ये शिकणाºया चार मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधम क्रीडाशिक्षकास राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. विजय विठ्ठल मनुगडे (वय ३५, रा. कपिलेश्वर, ता. राधानगरी, सध्या रा. देवकर पाणंद) असे त्याचे नाव आहे.राजेंद्रनगर येथील एका शाळेत घडलेल्या या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली ...

xलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हॉकी संघामध्ये सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून नववीमध्ये शिकणाºया चार मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधम क्रीडाशिक्षकास राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. विजय विठ्ठल मनुगडे (वय ३५, रा. कपिलेश्वर, ता. राधानगरी, सध्या रा. देवकर पाणंद) असे त्याचे नाव आहे.राजेंद्रनगर येथील एका शाळेत घडलेल्या या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो मुलींवर अत्याचार करत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याच पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले.अधिक माहिती अशी, राजेंद्रनगर येथील एका प्रसिद्ध शाळेत विजय मनुगडे हा गेल्या तेरा वर्षांपासून क्रीडाशिक्षक आहे. तो हॉकीचा विशेष प्रशिक्षक असल्याने जिल्हा, राज्यस्तरीय व राष्टÑीय स्तरावर मुला-मुलींना खेळविण्यासाठी प्रशिक्षण घेत असतो. शहराच्या विविध भागांतील मुले-मुली या शाळेत शिक्षण घेतात. नववीत शिकणाºया चार पीडित मुलींना संशयित विजय मनुगडे हा हॉकीचे प्रशिक्षण देत होता. प्रशिक्षणाच्या नावाखाली तो त्यांच्याशी जवळीक साधत अश्लील वर्तन करत असे. हॉकी संघामध्ये निवड करण्याचे आमिष दाखवून त्याने चारही मुलींवर शाळेच्या दुसºया मजल्यावरील शिकवणी रूममध्ये नेऊन अत्याचार केला. त्यानंतर कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने शाळेच्या वेळेत आपल्या देवकर पाणंद येथील फ्लॅटवर नेऊन अत्याचार केला. पाच ते सहावेळा या मुलींवर अत्याचार झाला आहे. अत्याचारावेळी चारही मुलींचे त्याने मोबाईलमध्ये फोटो घेतले आहेत. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुमचे बाहेर मित्रांसोबत संबंध आहेत, असे सांगून हॉकी खेळणे बंद करेन, अशी धमकी दिली होती. या चारही मुली एकमेकींच्या मैत्रिणी असल्याने त्यांना तो नेहमी जबरदस्ती करून अत्याचार करत असे. नराधम मनुगडे याला पोलिसांनी अटक केली. त्याला आज, शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पीडित चार मुलींची रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली.असा झाला उलगडाचार मुलींपैकी एका मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. शाळेला जाण्यास ती टाळाटाळ करू लागली. घरामध्ये कोणाशी न बोलता एकटीच बसणे, न जेवता झोपणे असा विचित्र स्वभाव दिसून आल्याने आई-वडील घाबरले. त्यांनी तिला विश्वासात घेत विचारणा केली. बिथरलेली मुलगी आई-वडिलांना मिठी मारत मोठ्याने रडू लागली. काय झाले हे समजायला मार्ग नव्हता. तासाभरानंतर ती शांत झाली तेव्हा वडिलांनी बाळ, तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहे, असा धीर दिल्यानंतर तिने तोंड उघडले. तिची हकीकत ऐकून आई-वडिलांना धक्काच बसला. तिच्याबरोबर अन्य तीन मैत्रिणींच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. त्यानंतर नराधम शिक्षकाला धडा शिकविण्यासाठी चारही मुलींचे पालक गुरुवारी (दि. १७) शाहूपुरी पोलीस ठाण्यात आले. याठिकाणी त्यांनी शिक्षकाविरोधात फिर्याद दिली. हा प्रकार राजेंद्रनगर येथील शाळेत घडल्याने ही फिर्याद गुरुवारी रात्री उशिरा राजारामपुरी पोलिसांकडे वर्ग केली. चारही मुली अल्पवयीन असल्याने संशयित आरोपी मनुगडे याच्या विरोधात बलात्कार (३७६), विनयभंग (३५४ अ ५०६), लहान मुलांचा लैंगिक अत्याचार कलम २०१२ चे ३ (ए), ५ (एफ), ६ ते १२ (एल) प्रमाणे गुन्हा दाखल केला.पश्चात्तापाचा लवलेश नाहीनराधम विजय मनुगडे याला अटक करून राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. त्याने अंगात टी-शर्ट व नाईटी पँट घातली होती. पोलीस चौकशी करत असताना बिनदिक्कतपणे तो उत्तरे देत होता. त्याच्या चेहºयावर पश्चात्तापाचा लवलेश दिसत नव्हता.तो अविवाहित असून देवकर पाणंद येथील फ्लॅटवर एकटाच राहत होता. पस्तीस वर्ष उलटूनही त्याने लग्न केले नव्हते. त्यामुळे गेल्या तेरा वर्षांच्या काळात त्याच्या अत्याचारास आणखी किती मुली बळी पडल्या आहेत या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.