शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

३९ कारखान्यांची साखर जप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:49 IST

कोल्हापूर : हंगाम सुरू होऊन पावणेतीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना एक रुपयाही न देणाºया राज्यातील ३९ साखर कारखान्यांवर महसुली ...

कोल्हापूर : हंगाम सुरू होऊन पावणेतीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना एक रुपयाही न देणाºया राज्यातील ३९ साखर कारखान्यांवर महसुली कारवाई करण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला आहे. यामध्ये १८ खासगी, तर २१ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांकडे १८१३ कोटी ८१ लाख थकीत एफआरपी असून, त्यांची साखर जप्त करून शेतकºयांना एफआरपीप्रमाणे पैसे देण्याचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा गायकवाड यांनी काढले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्याने सरकारला ही कारवाई करावी लागली आहे.साखरेचे दर घसरल्याने एकरकमी एफआरपी देता येत नसल्याची भूमिका राज्यातील कारखान्यांनी घेतली. तर एकरकमी एफआरपीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम राहिली आहे. सोमवारी (दि. २८) साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत कारखान्यांवर कारवाईची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. मंगळवारी एफआरपी थकविणाºया कारखान्यांवर कारवाईसाठी ‘स्वाभिमानी’ प्रयत्नशील होती. राज्यातील ३९ कारखान्यांनी शेतकºयांना एक दमडीही दिलेली नाही. त्यांच्याकडे १८१३ कोटी ८१ लाखांची एफआरपी थकीत आहे. या कारखान्यांना नोटिसा काढून २४ जानेवारी रोजी त्यांची सुनावणी घेतली. पाच दिवसांत या कारखान्यांनी पैसे न दिल्याने मंगळवारी रात्री महसुली कारवाईचे आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘दत्त-शिरोळ’, ‘जवाहर’, ‘पंचगंगा’, ‘शरद’, ‘वारणा’, ‘गुरुदत्त’, ‘संताजी घोरपडे’, ‘इको केन शुगर’; तर सांगली जिल्ह्यातील ‘महाकाली’, ‘वसंतदादा’, ‘केन अ‍ॅग्रो’, ‘निनाईदेवी’, ‘विश्वासराव नाईक’ व सातारा जिल्ह्यातील ‘किसन वीर’, ‘किसन वीर- प्रतापगड’, ‘किसन वीर- खंडाळा’ कारखान्यांचा समावेश आहे.दररोज ५० कारखान्यांना जप्तीच्या नोटिसापहिल्या टप्प्यात सुनावणी पूर्ण झालेल्या ३९ कारखान्यांवर साखरजप्तीची कारवाई केली. उर्वरित कारखान्यांपैकी रोज ५० कारखान्यांना नोटिसा काढून त्यांची सुनावणी घेतली जाईल आणि त्यांच्यावरही ही कारवाई करण्याची तयारी साखर आयुक्तांनी केली आहे.जिल्हाधिकारी आजपासून कार्यवाही करणारसाखर आयुक्तांनी महसूल कारवाईचे आदेश दिले आहेत. हे आदेश बुधवारी सकाळी संबंधित जिल्हाधिकाºयांना प्राप्त होणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होणार आहे.या कारखान्यांवर कारवाई होणारकोल्हापूर : दत्त-शिरोळ, जवाहर, पंचगंगा, शरद, वारणा, गुरुदत्त, संताजी घोरपडे, इको केन शुगर.सांगली : महाकाली, वसंतदादा, केन अ‍ॅग्रो,निनाईदेवी, विश्वासराव नाईकसातारा : किसन वीर- भुर्इंज, किसन वीर- प्रतापगड,किसन वीर- खंडाळा.सोलापूर : विठ्ठल-पांडे, गोकुळ शुगर, कुरमदास, सिद्धेश्वर, बबनराव शिंदे, जयहिंद शुगर.जळगाव : मधुकर. च्जालना : समृद्धी शुगर, रामेश्वरबीड : माजलगाव, वैद्यनाथ, जय महेश शुगर, जय भवानीपरभणी : रेणुका शुगर, त्रिधारा शुगर.उस्मानाबाद : शीला अतुल शुगर, शंभो महादेव.लातूर : पानगेश्वर, श्री साईबाबा शुगर अहमदनगर : गणेश, डॉ. बी. बी. तनपुरे औरंगाबाद : शरदनागपूर : वेंकेटेश्वरा